tree sakal
पुणे

पुणे : ...अन्‌ झाडांनी घेतला मोकळा श्वास!

अंधश्रद्धेतून ठोकलेल्या खिळ्यांतून मुक्त; ‘अंनिस’चा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चमत्कार सत्य शोधन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी होळकर पूल परिसरातील चार झाडांना खिळ्यांपासून मुक्त केले. यातून पारंपरिक अंधश्रद्धांचे जोखड उखडून फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

होळकर पुलाजवळील म्हसोबा मंदिर परिसरातील सहा झाडांना काळ्या बाहुल्या, दाभण, लिंबू, फोटो करणी करण्यासाठी किंवा करणी काढण्यासाठी झाडावर लावलेले साहित्य समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी काढून टाकले. एका झाडातून तर तब्बल ६० खिळे बाहेर काढण्यात आले. झाडांवर लावलेल्या सुमारे ४० बाहुल्याही कचऱ्याच्या कुंडीत फेकून देण्यात आल्या. समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव म्हणाल्या, ‘‘समाजाच्या डोक्यावर बसलेले अंधश्रद्धेचे भूत आता गाडून टाकण्याची गरज आहे. झाडांना बाहुल्या लावून कोणाचे वाईट होत नसते. त्यातून पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे अंधश्रद्धेच्या विरोधात तरुणांनी काम करण्याची गरज आहे.’’

या प्रसंगी मिलिंद देशमुख, ॲड. साधना बाजारे, श्रीराम नलावडे, भगवान काळभोर, राजु जाधव, विजय सुर्वे, सुभाष सोलंकी, मनोहर शेवकरी यांच्यासह समितीच्या पुणे, पिंपरी चिंचवड, खेड, चाकण शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा संमत होऊन पाच वर्षे झाली, तरी या कायद्याचा धाक जनमानसात निर्माण करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे.

- नंदिनी जाधव, कार्यकर्त्या, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT