School Trips esakal
पुणे

Pune : पुणे जिल्ह्यातील ३५५ शाळांना दोन दिवस सुट्टी

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेला दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील ३५५ शाळांना आणि अंगणवाड्यांना संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेला दिला आहे.

या आदेशानुसार या शाळा गुरुवारी (ता.२०) आणि शुक्रवारी (ता.२१) बंद राहणार आहेत. मात्र या शाळांना सुट्टी देण्यात आली असली तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आपापल्या शाळांवर उपस्थित रहावे लागणार आहे.

जिल्हादंडाधिकारी डॉ. देशमुख यांनी काल (बुधवारी) रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. शाळांबरोरच या भागातील अंगणवाड्याही बंद ठेवल्या जाणार आहेत.

या आदेशानुसार या भागातील सर्व अंगणवाडी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, सर्व मंडळांच्या अनुदानित व खाजगी शाळांना ही सुट्टी असणार आहे.

जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी याआधीच जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर केलेली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात अवघड क्षेत्रातील ३५५ शाळा निश्‍चित करण्यात आलेल्या आहेत.

सुट्टी दिलेल्या झेडपी शाळांची तालुकानिहाय संख्या

आंबेगाव --- ७३

बारामती --- शून्य

भोर --- ३६

दौंड --- शून्य

हवेली --- शून्य

इंदापूर --- शून्य

जुन्नर --- ३५

खेड --- ३६

मावळ --- ४८

मुळशी --- ६७

पुरंदर --- १७

शिरूर --- शून्य

वेल्हे --- ४३

एकूण --- ३५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT