rain 
पुणे

पुणेकरांनो, छत्री, रेनकोट जवळ ठेवा, दोन दिवस पावसाचा अंदाज 

सकाळवृत्तसेवा

पुणे- शहरात बुधवारी (ता. 6) दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता आहे. तसेच, गुरुवार (ता. 7) आणि शुक्रवारी (ता. 8) हलक्‍या स्वरूपाचा पाऊस शहर आणि परिसरात हजेरी लावले, असा अंदाज वेधशाळेने मंगळवारी वर्तविला. 

मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक व अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी पडत आहेत. रविवारपर्यंत (ता. 10) राज्यात हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. पुण्यात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा 1.2 अंश सेल्सिअसने कमी होऊन 27.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानात मात्र उच्चांकी वाढ झाली. हे तापमान सरासरीपेक्षा 9.2 अंश सेल्सिअसने वाढले. राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक तापमान पुण्यात वाढल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदले. पुण्यात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 19.7 अंश सेल्सिअसची नोंद झाली. 

विजांच्या कडकडाटासह पाऊस 
राज्यातील जवळपास सर्वच भागांत ढगाळ वातावरण असल्याने थंडीत चढ-उतार होत असून किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपासून तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT