ZP school students esakal
पुणे

Pune Zp School : झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार एकच गणवेश आणि पहिली तीन महिने एकच पुस्तक

शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याच्या योजनेत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याच्या योजनेत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बदल करण्यात आला आहे. या बदलांमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात सध्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकच गणवेश दिला जाणार आहे. या गणवेशासाठी प्रति विद्यार्थी ३०० रुपयांप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात सर्व शाळांच्या शालेय व्यवस्थापन समितीकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. हा गणवेश केवळ सर्व मुली, मागासवर्गीय मुले आणि दारिद्र्यरेषेखालील मुलांनाच मिळणार आहे. खुल्या प्रवर्गातील मुले यंदाही सरकारी गणवेशापासून वंचित राहणार आहेत.

दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून विद्यार्थांना सर्व विषयांसाठी आता एकच पाठ्यपुस्तक दिले जाणार आहे. या एकाच पुस्तकात सर्व विषयांचे पाठ देण्यात आले आहेत. यानुसार प्रत्येक तीन महिन्यांसाठी एक, याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार पुस्तकांचे मोफत वाटप केले जाणार आहे. आतापर्यंत सर्व विषयांसाठी प्रत्येकी एक, याप्रमाणे जेवढे विषय असतील, तेवढी पुस्तके दिली जात असत. या वृत्ताला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. पूर्वी हे वर्ग सातवीपर्यंतच होते. परंतु बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार पूर्वी सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांपैकी काही शाळांनी आठवीचा वर्ग सुरु केलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मोजक्याच शाळांमध्ये आठवीचा वर्ग सुरु झालेला आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांची उन्हाळी सुट्टी येत्या बुधवारी (ता.१४) संपत असून येत्या गुरुवारपासून (ता.१५) सर्व शाळा नियमितपणे सुरु होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद शाळांची संक्षिप्त माहिती

- जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा --- ३ हजार ७२५

- एकूण विद्यार्थी --- २ लाख २० हजार ६२५

- गणवेशासाठी पात्र विद्यार्थी --- १ लाख ६० हजार १६७

- गणवेशापासून वंचित राहणारे विद्यार्थी --- ६० हजार ४५८

- प्रति गणवेश मंजूर निधी --- ३०० रुपये.

- प्रति विद्यार्थी वाटप केली जाणारी पुस्तके --- चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT