पुणे

सातारा : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात रब्बी पेरण्या संथ

CD

‘रब्बी’ची केवळ
५ टक्केच पेरणी पूर्ण

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने रब्बी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर करता आली नाहीत. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ५ टक्केच रब्बी पेरण्या झाल्या आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

कृषी विभागाच्या २१ ऑक्टोबर २०२६ अखेरच्या अहवालानुसार, जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख १३ हजार २१० हेक्टर आहे. त्यापैकी आजअखेर केवळ १० हजार ६०४ हेक्टरवर म्हणजेच अवघ्या ५ टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

--- चौकट ---
ज्वारी, मक्याला प्राधान्य
जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ लाख ३५ हजार ५३२ हेक्टर असून त्यापैकी ८ हजार ५९३ हेक्टरवर (६ टक्के) पेरणी झाली आहे. मक्याची सरासरी १० हजार २१० हेक्टर क्षेत्रापैकी १ हजार ८२७ हेक्टरवर (१८ टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे.
----------------

थंडीची चाहुल नसल्याने गहू, हरभरा पिकांची पेरणी सुरवात झालेली नाही. गहू आणि इतर तृणधान्याची पेरणी नगण्य आहे. हरभऱ्यासह कडधान्यांचे सरासरी क्षेत्र २९ हजार ५०७ हेक्टर असताना केवळ १७७ हेक्टरवर (१ टक्के) पेरणी शक्य झाली आहे.

गळीतधान्यांचे सरासरी ३८० हेक्टर क्षेत्र असून अद्याप जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ किंवा जवस या तेलबियांची पेरणी शून्य टक्क्यांवरच अडकली आहे.

पश्चिम भाग निरंक !
तालुकानिहाय आकडेवारी पाहता, खटाव तालुक्यात सर्वाधिक ६ हजार १३३ हेक्टरवर (२१ टक्के) पेरणी झाली असून माण तालुक्यात ४ हजार ०१७ हेक्टरवर (९ टक्के) क्षेत्र पेरणीखाली आले आहे. फलटण तालुक्यात ३०४ हेक्टर (१ टक्के), साताऱ्यात ४३ हेक्टर, वाईत १७ हेक्टर, खंडोळ्यात ६ हेक्टर आणि कोरेगाव तालुक्यात अवघ्या ४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जावली, पाटण, कराड आणि महाबळेश्वर तालुक्यांत अद्याप रब्बीची पेरणी सुरू झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Pune News : औषधाच्या गोळीतून ब्लेडचे तुकडे खायला दिले; पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पत्नी फितूर होऊनही वैद्यकीय पुराव्यांवर निकाल

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी दौऱ्यावर; कसा असेल कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT