पुणे

आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा

CD

पुणे, ता. २४ : आपल्या विविध न्याय्य हक्कांसाठी गेल्या दहाहून अधिक दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सरकारने तातडीने या आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करावे, असे या पत्रात म्हटले आहे. हे पत्र त्यांनी आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील खात्यावर शेअर केले आहे.
पुण्यात आयोजित ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमादरम्यान एका आदिवासी विद्यार्थिनीने तिची आदिवासी विभागाच्‍या वसतिगृहाबाबतची व्यथा मांडली होती. त्‍याचा उल्लेख राहुल गांधी यांनी पत्रात केला आहे. या विद्यार्थिनीने वसतिगृहांमधील बिकट अवस्था आणि प्रशासनाच्या अपमानास्पद नियमांचा पाढा वाचला होता.
वसतिगृहातील जाचक अटी, तेथे राहण्‍याची वयोमर्यादा आणि विद्यार्थिनींची होणारी तपासणी याविरोधात राहुल गांधी आक्रमक झाले असून, त्‍यांनी ‘हे विद्यार्थी कोणतीही भीक मागत नसून, आपला हक्क मागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात,’ अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांच्या मागणीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून उपोषण करावे लागणे, ही गंभीर बाब असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT