पुणे

राहुल जगतापांची माघार, दत्ता पानसरे मैदानात!

CD

राहुल जगतापांची माघार,
दत्ता पानसरे मैदानात

श्रीगोंदे, ता. २१ : माजी आमदार राहुल जगताप जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेणार आणि दत्तात्रेय पानसरे उमेदवारी कायम ठेवणार, या ‘सकाळ’ने वर्तविलेल्या दोन्ही शक्यता खऱ्या ठरल्या. त्यामुळे श्रीगोंदे सेवा संस्था मतदारसंघात प्रतापसिंह पाचपुते विरुद्ध दत्तात्रेय पानसरे, अशी लढत निश्‍चित झाली.
सेवा संस्था मतदारसंघातील आठपैकी सहा उमेदवारी अर्ज बुधवारी (ता.२१) माघारी घेण्यात आले. यामध्ये राहुल जगताप, त्यांच्या आई अनुराधा, पत्नी प्रणोती, अर्चना पानसरे, अण्णासाहेब शेलार आणि संध्या महांडुळे यांचा समावेश आहे. प्रतापसिंह पाचपुते आणि दत्तात्रेय पानसरे या दोघांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.

माघारीच्या दिवशी सकाळी राहुल जगताप यांच्या पिंपळगाव पिसा येथील निवासस्थानी प्रमुख नेते आणि ठरावधारकांची बैठक झाली. जगताप यांच्यासह ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार आणि दत्तात्रेय पानसरे उपस्थित होते. या बैठकीला ८७ ठरावधारक उपस्थित असल्याचा दावा जगताप-पानसरे गटाने केला. बैठकीत जगताप यांनी माघार घेऊ नये, पाचपुते यांना बिनविरोध निवडून देऊ नये आणि जगताप यांनी माघार घेतल्यास पानसरे यांनी उमेदवारी कायम ठेवावी, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. बैठकीनंतर सर्व प्रमुख नेते अहिल्यानगरकडे रवाना झाले. तेथेही पानसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, पानसरे यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे आमदार विक्रम पाचपुते यांच्या बिनविरोधच्या प्रयत्नांना यश आले नाही.
--------
आता बँकेच्या निवडणुकीत माघार
तत्कालीन आमदार राहुल जगताप यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी माघार घेतली होती. आता, जिल्हा बँकेचे संचालक असतानाही त्यांना बँकेच्या निवडणुकीतूनही माघार घ्यावी लागली. या दोन्ही माघारीच्या मुळाशी कुकडी ‘कारखान्या’समोरील अडचणी हाच कळीचा मुद्दा असून, जगताप यांना आधी आमदारकी आणि आता जिल्हा बँकेचे संचालकपद राखण्यातही त्यांना अपयश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT