शिंदे वस्ती, रावेत - भक्ती-शक्ती चौकाकडून रावेतकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाला जोडण्यासाठी लोहमार्गावरून 50 मीटर लांबीचे लोखंडी गर्डर मंगळवारपासून बसविण्यात येणार आहेत. 
पुणे

रावेतजवळ रेल्वेचा आजपासून ब्लॉक

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी - निगडीकडून किवळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलासाठी लोहमार्गावर ५० मीटर लांबीचे सात लोखंडी गर्डर टाकण्याचे काम मंगळवारपासून (ता. १५) चार दिवस करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेकडून रोज दुपारी एक तास दहा मिनिटे कालावधीचा ब्लॉक मंजूर केला आहे.

रावेतमधील शिंदे वस्तीजवळ दुपारी एक वाजून ४० मिनिटांपासून दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत हे काम करण्यात येईल.

येथे दोन पूल उभारण्यात येत आहेत. त्यापैकी एका पुलाचे गर्डर टाकण्याचे काम उद्यापासून सुरू होत आहे. दुसऱ्या पुलाचे काम २८ ते ३१ जानेवारीदरम्यान करण्यात येईल. या पुलामुळे पुणे-मुंबई महामार्ग व देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्ग जोडले जाणार आहेत. वाहने भोसरीहून स्पाईन रस्त्यावरून निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून या नवीन पुलावरून जातील. तेथून रावेतमधील मुकाई चौकातून देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाकडे वाहने मार्गस्थ होतील. त्यामुळे रावेतमधील बास्केट ब्रिज, आकुर्डी, देहूरोड येथील कोंडी कमी होईल.

गर्डर टाकण्यासाठी २७५ टन वजनाची क्रेन आणली असून, चारशे टन वजनाची जादा क्रेनही जागेवर तयार ठेवली आहे. या जागेची व तयारी पाहणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यांच्या नियंत्रणाखालीच हे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सोमवारी दिली. ते म्हणाले, की सात गर्डर टाकण्यात येणार आहेत. रोज दोन गर्डर बसविले जातील. एका गर्डरचे वजन १२२ टन आहे. याच पद्धतीने महिनाअखेरीला दुसऱ्या पुलाचे गर्डर बसविले जातील.

लोहमार्गावरील पुलावर पन्नास मीटर लांबीचे गर्डर टाकण्याचे काम प्रथमच होत आहे. जुलैपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्यात येईल. 
- प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता, महापालिका

नियोजित पूल
प्रकल्पाचा खर्च - ७७ कोटी रुपये
डाव्या बाजूची लांबी - ८९१ मीटर
उजव्या बाजूची लांबी - ९१५ मीटर
निगडीकडील पोच रस्ता - २९३ मीटर
रावेतकडील पोच रस्ता - १६२ मीटर
रस्त्याची रुंदी - ४५ मीटर
दोन्ही पुलांसाठी खांब - ३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT