Pune Rain esakal
पुणे

Pune Rain : पुणे शहर, जिल्ह्यात सरासरीच्या ७९ टक्केच पाऊस

पुणे शहर व जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत फक्त ६८४.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत फक्त ६८४.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाचे हे प्रमाण वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत ७८.९ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत शहर व जिल्ह्यात मिळून १०४७.५ मिलिमीटर पाऊस पडला होता. या आकडेवारीवरून गेल्या वर्षीच्या तुलनेत आजअखेरपर्यंत ३६३.४ मिलिमीटर पाऊस कमी पडला आहे.

गेल्या वर्षी १ जून ते २ ऑक्टोबर या सुमारे चार महिन्यांच्या कालखंडात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. यंदाच्या पावसाळ्यात मात्र अद्याप पावसाला वार्षिक सरासरी गाठता आलेली नसल्याचे जिल्हा कृषी विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पावसाच्या आकडेवारी अहवालातून उघड झाले आहे. पुणे शहर व जिल्ह्याचा मिळून ८६६.३ मिलिमीटर इतका आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात आजअखेरपर्यंत पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यातील मावळ, भोर, आंबेगाव आणि खेड या चारच तालुक्यात त्या त्या तालुक्याच्या वार्षिक सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. याशिवाय जुन्नर आणि वेल्हे हे दोन तालुके त्या त्या तालुक्यांच्या वार्षिक सरासरी पावसाच्या आसपास पोचले आहेत.

पुणे शहरात ४३७ मिलिमीटर पाऊस

पुणे शहरात यंदाच्या पावसाळ्यात आजअखेरपर्यंत एकूण ४३७.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे हे प्रमाण शहराच्या वार्षिक सरासरी पावसाच्या ७१.६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात आजच्या तारखेपर्यंत पुणे शहरात एकूण ८०५.८ मिलिमीटर (१३२ टक्के) पाऊस पडला होता, असे दिसून आले आहे.

अशी असते प्रक्रिया

  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने दरवर्षी एक जूनपासून दररोज पडणाऱ्या पावसाची नोंदणी केली जाते.

  • यानुसार दररोज तालुकानिहाय पडलेल्या पावसाची नोंद.

  • महिनानिहाय एकूण सरासरी पावसाची नोंद.

  • एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात झालेल्या पावसाच्या आकडेवारीचा अहवाल रोज रात्री प्रसिद्ध केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT