weather update maharashtra pune yellow alert rain forecast  sakal
पुणे

Rain : राज्यात मॉन्सूनची प्रगती संथच! पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात सक्रिय होण्याचा अंदाज

मॉन्सूनच्या वाटचालीस आता पुन्हा पोषक स्थिती निर्माण झाली असून यामुळे मॉन्सून राज्याच्या आणखी काही भागात प्रवेश करेल असी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Rain - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल सुरू झाली असून राज्यात मात्र मॉन्सूनची प्रगती संथ गतीनेच सुरू हे. जूनचा तीसरा आठवडा उलटून गेला असून अद्याप राज्यात मॉन्सूनच्या पावसाची अद्याप प्रतिक्षा कायम आहे.

दरम्यान पुढील दोन ते तीन दिवसात मॉन्सून महाराष्ट्राच्या काही भागांसह ओडिशा, पश्‍चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मॉन्सूने सध्या बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगालच्या काही भागात दाखल झाला असून गुरुवारी (ता. २२) आंध्र प्रदेशाच्या उर्वरित भागासह तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती केली आहे. मॉन्सूनने राज्याच्या दक्षिण भागात तसेच तळ कोकणात (ता. ११) प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल ही थांबत-थांबत सुरू होती.

मात्र आता मॉन्सूनच्या वाटचालीस आता पुन्हा पोषक स्थिती निर्माण झाली असून यामुळे मॉन्सून राज्याच्या आणखी काही भागात प्रवेश करेल असी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा दक्षिण भारतात रत्नागिरी, रायचूर, खाम्मम, मलकंगिरी, परलखेमुंडीपर्यंत, तर पूर्व भारतात हलदिया, बोकारो, पाटणा, राक्सौलपर्यंत आहे.

दरम्यान पोषक स्थिती असल्यामुळे येत्या रविवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पश्‍चिम बंगाल, झारखंड, बिहार, ओडिशाच्या उर्वरित भागासह छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेशचा काही भाग व्‍यापनाची शक्यता आहे. दरम्यान पुणे आणि मुंबईसाठी मान्सून नुकताच दार ठोठावत आहे. अपेक्षित आर्द्रता, पश्‍चिम वारे अशा पोषक स्थितीमुळे ही मॉन्सूनच्या राज्यातील प्रवेशाबाबत हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT