Rajiv Bajaj  sakal
पुणे

Rajiv Bajaj : आयुष्यात वास्तविकतेला प्राधान्य द्या ; सिंबायोसिसमध्ये अभियांत्रिकी कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उदघाट्न

जीवनात कोणत्याही परिस्थितीत कायम वास्तववादी रहा. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही कराल ते उत्कृष्टतेसाठी करा. जेव्हा तुम्ही उत्कृष्टता प्राप्त करता तेव्हा पैसा आणि प्रसिद्धी आपोआप तुमच्याकडे येते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जीवनात कोणत्याही परिस्थितीत कायम वास्तववादी रहा. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही कराल ते उत्कृष्टतेसाठी करा. जेव्हा तुम्ही उत्कृष्टता प्राप्त करता तेव्हा पैसा आणि प्रसिद्धी आपोआप तुमच्याकडे येते. आयुष्यात सिद्धांत हा पाया असला तरी वास्तविकतेला प्राधान्य द्या, असा सल्ला बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी विद्यार्थ्यांना दिला.

लवळे येथील सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे बजाज इंजिनिअरिंग स्किल्स ट्रेनिंग (बेस्ट) केंद्राच्या उद््घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

बजाज पुढे म्हणाले, ‘‘तुमची स्वतःची ओळख कायम सांभाळा. तुम्हाला आयुष्यात नेमके काय करायचे आहे ते ठरवा व त्यामध्ये स्पष्टता आणा.’’ डॉ. मुजुमदार यांनी सांगितले की, हे केंद्र म्हणजे उद्योग व शिक्षण क्षेत्रातील भागीदारीच्या क्रांतीची नांदी आहे. उद्योग जगतासाठी कुशल मनुष्यबळ घडवणे हा केंद्राचा उद्देश असेल. केतन कोटेचा यांनी स्वागत केले. कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT