पुणे

हिलदेव घाटातील अपघात प्रकरणाला वेगळे वळण निष्काळजी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

CD

AKL26B16576, AKL26B16577, AKL26B16578


निष्काळजी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल


राजूर, ता.१५ : राजूर-मवेशी मार्गावरील हिलदेव घाटात झालेल्या अपघातप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात भगवंता बिंदू मुठे यांचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. २००फूट खोल दरीत ही कार पडली. सातेवाडी येथील दत्तात्रय बिंदू मुठे यांनी राजूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचे मोठे भाऊ भगवंता बिंदू मुठे हे त्यांचा मुलगा सार्थक मुठे व संदीप एकनाथ बांगर यांच्यासह कारमधून राजूर येथे कामानिमित्त आले होते. त्यानंतर मवेशी येथे पाहुण्यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना हिलदेव घाटात हा अपघात झाला. फिर्यादीनुसार, रात्री सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास वाहनचालक संदीप बांगर याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत असताना रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा गमावला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूस उलटून दरीत गेली. अपघातात भगवंता मुठे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. सार्थक मुठे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, संदीप बांगर यालाही हातापायाला मार लागला आहे. स्थानिक सुरेश भांगरे, शंकर साबळे, मुकुंद तळपाडे नागरिकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविले. या प्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात संबंधित वाहन चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT