पुणे

जमनापुरी, खस्सी, गावरान बोकडांना भाव

प्रसाद पाठक

पुणे - जमनापुरी, बरबरा, तोतापुरी, खस्सी, अंडूल आणि देशी गावरान जातीच्या बोकडांचे भाव बकरी ईदनिमित्त वधारले आहेत. दोन ते चार वर्षांच्या बोकडाला आठ हजारांपासून २५ हजारांपर्यंत भाव आला आहे. दिवसाला पाचशे ते सहाशे बोकडांची विक्री होत आहे. 

भवानी पेठेतील लक्ष्मी बाजार बोकडाच्या खरेदी- विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या ऐंशी वर्षांपासून येथे बकरी ईदनिमित्त बोकडांचा बाजार भरतो. बकरी ईद २२ ऑगस्टला असल्याने दहा ऑगस्टपासूनच येथे बाजार भरला आहे. परराज्यांतून विक्रेत्यांनी वेगवेगळ्या जातींचे बोकड विक्रीसाठी आणले आहेत. साधारणतः चाळीस ते पन्नास हजार रुपयांची उलाढाल दरवर्षी या बाजारात होते. विक्रेते दत्तात्रेय घोडके म्हणाले, ‘‘कोणी गावरान बोकड खरेदी करते, तर कोणी खस्सी, अंडूलला पसंती देतात. खस्सी आणि अंडूल जातींच्या बोकडास दहा ते पंचवीस हजारांपर्यंतही भाव मिळतो. ईदसाठी आम्ही मध्य प्रदेश, बोरगाव, चाकण, यवत तसेच पुणे जिल्ह्यातल्या खेडेगावांतूनही बोकड खरेदी करतो.  कोणी एक, दोन, चार, दहा अशा प्रमाणात बोकडांची मागणी करतात. त्यानुसार बोकडांची विक्री करतो.’’ 

विक्रेते विनायक नकाते म्हणाले, ‘‘दोन दात असलेला बोकड हा अठरा महिन्यांचा किंवा दोन वर्षांचा असतो, तर तीन ते चार दात आलेला बोकड अडीच ते तीन वर्षांचा असतो. साधारणतः तीस किलो वजनाचा बोकड असतो. बोकडाला भाव चांगला यावा, यासाठी त्याला शेवरी, मका, वडाचा व उंबराचा पाला, सुबाभूळ, कडबा कुट्टी खायला घालतो. जेवढा बोकड वजनदार, तेवढा त्याला चांगला भाव येतो. गिऱ्हाइक चवीसाठी गावरान बोकड अधिक खरेदी करतात.’’  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT