बंद शिधापत्रिकांबाबत उद्या
काँग्रेसचे धरणे आंदोलन
४७७७ रेशन पूर्ववत सुरू करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २४ : मिशन सुधार योजनेंतर्गत बंद करण्यात आलेली तालुक्यातील ४,७७७ रेशन कार्ड पूर्ववत सुरू करावीत. तसेच रेशन कार्ड असूनही धान्य न मिळणाऱ्या लाभार्थींना नियमित धान्य द्यावे, या मागण्यांसाठी मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (ता. २६) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. याबाबतचे निवेदन मंगळवेढा पोलिस ठाण्यात देण्यात आले.
मिशन सुधार योजनेंतर्गत रेशन कार्ड बंद झाल्याने अनेक गरीब व गरजू कुटुंबे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्यापासून वंचित आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार शिंदे यांनी यापूर्वी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कार्ड पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. सणासुदीच्या काळातही हजारो कुटुंबांना धान्य मिळत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष प्रशांत साळे आणि शहराध्यक्ष ॲड. राहुल घुले यांनी दिली. रेशनसाठी पात्र असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना नवीन रेशन कार्ड देऊन अन्नधान्याचा लाभ सुरू करावा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.