शिंदे वस्ती, रावेत - रस्त्याचे सुरू असलेले काम. 
पुणे

रावेतमध्ये रस्त्यांचे जाळे

पीतांबर लोहार

पिंपरी - पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि देहूरोड संरक्षक विभाग यामुळे विस्ताराला मर्यादा असलेल्या रावेत परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या मुख्य तीन रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून, सात रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण या दहा पक्‍क्‍या रस्त्यांमुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. 

पवना नदी, लोहमार्ग, देहूरोड संरक्षक विभाग आणि मुंबई-बंगळूर महामार्ग यामुळे रावेत परिसराच्या विस्तार मर्यादित राहिला आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी रावेतचा महापालिकेत समावेश झाला. तेव्हापासून बंगळूर महामार्ग ते वाल्हेकरवाडीमार्गे चिंचवडगाव या एकाच एकेरी रस्त्याने रावेतचा पिंपरी-चिंचवडशी संपर्क होता. दरम्यान, पवना नदीवर बास्केट पूल उभारण्यात आला. त्यामुळे ताथवडे- थेरगावमार्गे पुणे, पिंपरी-चिंचवडशी; तर व डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलासमोरील रस्त्याच्या उभारणीमुळे आकुर्डी रेल्वे स्थानकाशी रावेत जोडले गेले. हळूहळू बागायती शेती कमी होत गेली.

शैक्षणिक संकुले व टोलेजंग इमारती उभ्या राहून गृहनिर्माण सोसायट्या निर्माण झाल्या. ‘इस्कॉन’च्या श्रीकृष्ण मंदिरामुळे रावेत जगाच्या नकाशावर पोचले. एकीकडे वस्ती वाढत असताना उपलब्ध रस्ते अपुरे पडू लागले. त्यामुळेच महापालिकेने रस्ते विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवले. सध्या रावेतसह किवळे, मामुर्डी परिसरात रस्त्यांचे जाळे विणले जात आहे.

रावेतमध्ये तीन रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे आहेत. किवळे, मामुर्डी भागातही रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. सात रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होईल. 
- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका

असे आहेत रस्ते
भक्ती-शक्ती चौक ते बंगळूर महामार्गाला जोडणाऱ्या बीआरटी रस्त्याचे काम सुरू आहे. सर्वे क्रमांक ७५ ते भोंडवे बाग रस्ता १८ मीटर रुंद केला जात आहे. शिंदे वस्ती कॉर्नर ते पाण्याची टाकी हा रस्ता १८ मीटर रुंद केला जात आहे. धर्मराज चौक ते इस्कॉन मंदिर हा लोहमार्गाला समांतर रस्ता २४ मीटर रुंद केला जात आहे. धर्मराज चौक ते बास्केट पूलदरम्यानचा रस्ता २४ मीटर रुंद केला जाणार आहे. मुकाई चौक ते बास्केट पूल रस्ता औंध बीआरटी रस्त्याला जोडला आहे. वाल्हेकरवाडी रस्त्याचे काम सुरू आहे. 

निविदा एक - २३ कोटी ५४ लाख 
निविदा दोन - ९ कोटी २३ लाख 
निविदा तीन - ९ कोटी २४ लाख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : रक्षाबंधनानिमित्त रामदास आठवलेंची कामाठीपुराला भेट; महिलांनी बांधली राखी

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT