पुणे

डिंभे धरणातील जुन्या जैन मंदिराचे दर्शन

CD

फुलवडे, ता. १९ : आंबेगाव (ता. आंबेगाव) येथील डिंभे धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यामुळे खालावल्याने, जलाशयाखाली गेलेले ऐतिहासिक जैन मंदिर पुन्हा एकदा उघडे पडले आहे. तब्बल २४ वर्षांनंतरही हे मंदिर सुस्थितीत असून, यामुळे विस्थापित आंबेगावकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

घोड आणि बुब्रा नदीच्या संगमावर वसलेले आंबेगाव हे २००० मध्ये डिंभे धरणाच्या निर्मितीमुळे पूर्णपणे पाण्याखाली गेले. धरणाचे दरवाजे बंद झाल्यानंतर या परिसरातील घरे, वाडे आणि मंदिरे जलमय झाली.
उन्हाळ्याच्या अखेरीस विशेषतः मे महिन्यात धरणातील पाण्याची पातळी खालावल्यावर हे जैन मंदिर उघडे पडते. त्यामुळे डिंभे धरणातील नामशेष झालेल्या आंबेगावच्या ऐतिहासिक पाऊलखुणा, खेळणारे चिमुकले हात, गावातील गजबजलेल्या गल्ल्या, शाळेतील मुलांची घोकंपट्टी सर्व काही शांत होत गेले. जुनी घरे, वाडे, मंदिरे जमीनदोस्त झाली. हे मंदिर पाहण्यासाठी आणि आपल्या जुन्या गावाच्या खुणा शोधण्यासाठी विस्थापित ग्रामस्थ धरणाच्या परिसरात गर्दी करतात. गावठाणातील गजबजलेल्या गल्ल्या आणि जुन्या व्यवसायांच्या आठवणींनी ग्रामस्थ भावूक होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain : मढेघाट धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला; १३ गावांचा वाहतुकीचा संपर्क तुटला

Nashik Red Alert: नाशिकला रेड अलर्ट; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंगी गड व नांदुरी घाट मार्ग ७ ते ९ जुलैपर्यंत भाविकांसाठी बंद

Junnar Rains : जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने धरणसाठा वाढला; अलदरेतील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update: पुण्यात पाच दिवस पाणीकपात रद्द

Pune Mula-Mutha flood : मुळा-मुठा नदीला पूर; कोरेगाव मुळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT