पुणे

पिंपरखेड येथील ग्रामसभेत राजीनामा देण्याचा ठराव

CD

टाकळी हाजी, ता. २ : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील विविध विकासकामांच्या मुद्द्यांवरून झालेली ग्रामसभा वादळी ठरली. यामधे सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या राजीनामा घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

पिंपरखेड येथील मारुती मंदिरामध्ये ग्रामसभा पार पडली. यावेळी सरपंच राजेंद्र दाभाडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसरपंच विकास वरे, ग्रामसेवक आशिष भागवत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

या सभेमध्ये ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यामध्ये एकमत नसल्यामुळे विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे. सर्व सदस्यांनी राजीनामा देण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. तसेच गावात गेली वर्षभरात केलेल्या कामांच्या खर्चाचा ठरावही नामंजूर करण्यात आला. याबाबत सरपंच राजेंद्र दाभाडे म्हणाले, ‘‘गावात कोणताही कामात भ्रष्टाचार झाला नसून अत्यंत चांगल्या प्रकारचे काम केलेली आहेत. काही चुकीचे काम झाले असल्यास कोणीही ते दाखवून द्यावे. मी केलेल्या कामाचा लेखाजोखा देण्यास तयार असून राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही.’’

THJ24A00182

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Van Accident : पुण्यात धक्कादायक अपघात! पोलीस व्हॅनने उडवल्या ७ गाड्या; CCTV व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : नागपुरात E20 विरोधात गडकरींच्या घरासमोर युवक काॅंग्रेस आक्रमक

Chandrakant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये दैवी गुण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

Pune News: पुणेकरांनो, अजून किती वाट पाहणार? PMRDA चे ३,९०६ कोटींचे प्रकल्प अजूनही रखडले, घोषणा फक्त कागदावरच..

Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

SCROLL FOR NEXT