पुणे

‘सारथी’च्या लाभार्थ्यांनी नोकरीनंतर मदत परत द्यावी मराठा सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

CD

पुणे, ता. २६ : ‘सारथी’ संस्थेमार्फत उच्च शिक्षण, परदेशातील शिक्षण, पीएच. डी., आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आर्थिक लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी, नोकरी किंवा व्यवसाय सुरू केल्यानंतर ती रक्कम सरकारला परत करावी, अशी मागणी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुंजीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सरकारने विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीची जाणीव राहावी आणि या रकमेतून पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना मदत व्हावी, या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. बँकांच्या शैक्षणिक कर्जाप्रमाणेच, मात्र व्याजाविना केवळ मुद्दल रक्कम परत घेण्याची अट सरकारने घालावी. तसेच, ‘पे बॅक टू द सोसायटी’ या तत्त्वानुसार यशस्वी विद्यार्थ्यांनी स्वतःहून रक्कम परत करून इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, असे कुंजीर यांनी निवेदनात म्हटले आहे.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT