MSRDC Sakal
पुणे

Pune Ringroad : प्रकल्पग्रस्तांना देणार नोटिसा; भूसंपादन प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील पश्चिम भागातील भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील पश्चिम भागातील भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत पश्‍चिमेकडील ३६, तर पूर्वेकडील चार गावांतील प्रकल्पग्रस्तांना नोटीसा देण्यात येतील. संमतीपत्र सादर करण्यासाठी त्यांना ३० जुलैपर्यंतची मुदत असेल.

भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सामेवारी आढावा बैठक घेतली. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सुधारीत नियमाप्रमाणे नव्याने दर निश्चित केले आहेत. बाधित गावांबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना सादर करण्यात आला.

बैठकीनंतर डॉ. देशमुख म्हणाले, ‘राज्य शासनाच्या निर्देशानुसार पश्चिम आणि पूर्व भागांतील बाधित गावांचे फेरमुल्यांकन करण्यात आले आहे. पश्चिम भागातील बाधित होणाऱ्या मावळ, मुळशी, भोर, हवेली तालुक्यातील ३६; तर पूर्वेकडील भोर तालुक्यातील चार बाधित गावांतील जमिनींची दरनिश्चिती करण्यात आली. त्यामुळे ८०४ हेक्टर जमिनींचे भूसंपादन करण्यात येईल.

बाधित खातेदारांची संख्या सुमारे दोन हजार ९९२ एवढी आहे. त्यांना दोन दिवसांत नोटीस देण्यात येतील. स्वत:हून संमतीपत्र देणाऱ्यांना २५ टक्के अतिरीक्त मोबदला मिळेल. पुर्वेकडील गावांत संपादीत केल्या जाणाऱ्या जमिनींचे फेरमुल्यांकन करून जिल्हा समितीला अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला. त्यासाठी वीस जुलैपर्यंत मुदत आहे.

वर्तुळाकार रस्त्याच्या पश्चिमेकडील बाधित ३२ गावांचे फेरमुल्यांकन करून दर निश्चिती करण्यात आली आहे, तर पूर्वेकडील ४८ गावांपैकी ४ गावांची दरनिश्चिती झाली असून ४२ गावांचे अंतिम दर निश्चित करण्यासाठी २० जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

दर निश्चित झालेल्या गावांमध्ये बाधितांना विश्वासात घेऊन संमतीपत्र घेण्यात येणार आहे. त्यासाठी भूधारकांना नोटीस बजावण्यात येणार असून त्यासाठी गावनिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT