Rohit Pawar sakal;
पुणे

Rohit Pawar : विश्वासार्हतेअभावी कुटुंबात खासदारकी;रोहित पवार यांचा अजित पवार यांना टोला,काकींचे अभिनंदन

‘‘राज्यसभेच्या खासदार म्हणून सुनेत्रा (काकी) पवार यांचे अभिनंदन करतो. वास्तविक अजित पवार त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळींवर विश्वास नसेल अथवा त्यांचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत याची जाणीव झाल्यानेच त्यांनी कुटुंबातील सदस्याला संधी दिली असावी,’’ अशी खोचक प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

माळेगाव, (जि.पुणे) : ‘‘राज्यसभेच्या खासदार म्हणून सुनेत्रा (काकी) पवार यांचे अभिनंदन करतो. वास्तविक अजित पवार त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळींवर विश्वास नसेल अथवा त्यांचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत याची जाणीव झाल्यानेच त्यांनी कुटुंबातील सदस्याला संधी दिली असावी,’’ अशी खोचक प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

राज्यसभेच्या खासदार म्हणून सुनेत्रा पवार बिनविरोध झाल्यानंतर रोहित पवार आज बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अजित पवार भाजपबरोबर गेल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेला आवडले नाही म्हणून सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून त्यांचा तेथे पराभव झाला. झाले ते झाले, आता सुनेत्राकाकी राज्यसभेच्या खासदार झाल्याने मी त्यांचे काल आधीच अभिनंदन केले होते.’’

सुनेत्रा पवार यांच्या राज्यमंत्रिपदाचीही चर्चा सुरू आहे, असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, ‘‘खरेतर अजित पवार यांनी याआगोदर सांगितले होते की राज्यमंत्रिपद आम्हाला शोभणारे नाही. असे असताना आगामी काळात सुनेत्राकाकींना राज्यमंत्रिपद दिले गेल्यास त्याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागेल.’’ ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती. परंतु त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. यावर रोहित पवार म्हणाले, ‘‘अजित पवार यांच्या पक्षात शंभर टक्के अस्वस्थता आहे. ती मोठ्या नेत्यांमध्ये आहे की आमदारांमध्ये आहे हे अजित पवार जाणून आहेत. ती अस्वस्थता विचारात घेता कोणावरच विश्वास ठेवता येणार नसल्यामुळे त्यांनी घरात राज्यसभेची उमेदवारी दिली, असे कोठेतरी आता आपल्याला म्हणावे लागेल.

जयंत पाटलांशी वाद नाही

जयंत पाटील आणि तुमच्यात वाद आहे, असे बोलले जाते याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘‘मी आणि जयंत पाटील यांनी सामान्य लोकांना, कार्यकर्त्यांना आणि शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय दिले आहे. त्यामुळे आम्हा दोघांमध्ये वाद असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. मीडियाने वेगळी भूमिका मांडली आणि विरोधकांनी त्याला खतपाणी घातले, एवढेच त्यात आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri 2159 Crore Investment : महाराष्ट्रात 82,655 कोटींची विक्रमी गुंतवणूक; 1.55 लाख तरुणांना मिळणार रोजगाराच्या संधी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Mumbai MHADA: मुंबईत म्हाडाच्या सात मजली इमारतीचा प्लास्टर कोसळला; १७ वर्षीय मुलीसह तिघे जखमी

Mhada: उमरखाडीचा समूह पुनर्विकास, रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

Marathi News Live Updates : चिपळूण उड्डाणपुलाची आज पाहणी; नागरिकांच्या तक्रारीची दखल, कामाच्या दर्जाबाबत शंका

झी मराठीवर स्टार प्रवाहच्या हिरोची एन्ट्री; ‘धाकट्या सूनबाई’साठी 'या' अभिनेत्याचं नाव पक्कं?

SCROLL FOR NEXT