पुणे

दसऱ्याला निघणार देवीमातेच्या विसर्जन व धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूका

CD

रूपाभवानी फोटो

सीमोल्लंघनानंतर आज रूपाभवानी मातेची पालखी मंदिरात परतणार
सायंकाळी होणार सोहळा; ८० हून अधिक नवरात्र मंडळांच्या मिरवणुका

सोलापूर, ता. १९ ः नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त ग्रामदेवी रूपाभवानी मातेच्या पालखीचा सीमोल्लंघन सोहळा मंगळवारी सायंकाळी होणार आहे. सायंकाळी पाच वाजता मंदिरातून निघालेली पालखी पार्क चौकातील शमी वृक्षाजवळ महापूजा करून मंदिरात परतणार आहे. यानिमित्त ८० हून अधिक मंडळांच्या मिरवणुका निघणार असून, ३३६ हून अधिक मंडळे जागेवरच महाआरती करणार आहेत.
---------------------------------
पालखीचा मार्ग : रूपाभवानी मंदिरातून निघालेली पालखी बलिदान चौक, मधला मारुती, विजापूर वेस, पंचकट्टा आणि रेमंड शोरूममार्गे पार्क चौकात पोहोचेल. सायंकाळी सात वाजता परतीच्या प्रवासात लक्ष्मी मार्केटजवळील मारुती मंदिरमार्गे दत्त चौकातील मसरे गल्ली येथील देवी मंदिरात आरती व प्रसादवाटप होईल. भोगडे गल्लीतील देवी मंदिरातही पालखी भेट देईल. रात्री अकराच्या सुमारास पालखी मंदिरात परतल्यानंतर यात्रेचा समारोप होईल.
------------------------------------
मध्यवर्ती महामंडळाची मिरवणूक : मंगळवार पेठ पोलिस चौकीपासून सुरू होणारी मिरवणूक बाळू भाऊ चौक, भूलाभाई चौक, कन्ना चौक आणि गौतम चौकमार्गे पुन्हा पोलिस चौकीत येईल. येथे मान्यवरांच्या उपस्थितीत महापूजा झाल्यानंतर पालखी मधला मारुती, विजापूर वेस, पंचकट्टा आणि सिद्धेश्वर मंदिराजवळून पार्क चौकातील शमी वृक्षाजवळ पोहोचेल. जुना बोरामणी नाका येथील इंद्रभवानी मंदिराची पालखी बाळू भाऊ चौकात सहभागी होईल. रूपाभवानीसह शिवगंगा, श्री अंबाबाई, हिंगुलांबिका आणि इंद्रभवानी देवी मंदिरांच्या पालख्याही सोहळ्यात सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT