metro sakal
पुणे

धावत्या मेट्रोत लग्नाची बोलणी अन्‌ साखरपुडाही

पुणेकरांना अल्पशुल्कात विविध कार्यक्रम साजरे करण्याची मिळणार संधी

दिलीप कुऱ्हाडे

येरवडा : तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत वाढदिवस साजरा करायला धावत्या मेट्रोमध्ये परवानगी मिळाली तर? काय भन्नाट कल्पना आहे ना. पण हे वास्तवात लवकरच येणार आहे. लहान मुलांच्या वाढदिवस असो की विवाहाचा वाढदिवस, प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या विशेष दिवस साजरा करण्यासाठी मेट्रो स्वागत करणार आहे. हौसेला मोल नाही असे म्हणतात पण अल्प शुल्कात पुणेकरांना विविध कार्यक्रम धावत्या मेट्रोमध्ये साजरा करता येणार आहेत.

डिसेंबर अखेर मेट्रो रेल्वे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते वल्लभनगर आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालय दरम्यान धावणार आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी महामेट्रो मेट्रोमध्ये लहान मोठे वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देणार आहे.

असा असणार उपक्रम...

  • लहान मुलांचे व ज्येष्ठांचे वाढदिवस

  • विवाहाची बोलणी, साखरपुडा

  • विवाहाचा वाढदिवस

  • खर्च सभागृहाच्या भाड्यापेक्षाही कमी असणार

  • कार्यक्रम करणाऱ्या गटाला तिकिटांसह अवघे तीन ते पाच हजार रुपये शुल्क आकारले जाणार

  • महामेट्रो अशा प्रकारचे अभिनव उपक्रम नागपूर मेट्रोमध्येही राबविते

तीस स्थानकांत कार्यक्रमांचे नियोजन

नागपूर मेट्रो स्थानकावर १५ ऑगस्ट रोजी मेंहदी उत्सव रंगला होता. याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मेट्रो स्थानकावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा विचार महामेट्रोचा आहे. त्यामुळे असे विविध उपक्रम पुणे मेट्रोच्या तीस स्थानकांत राबविण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT