rupi bank
rupi bank sakal
पुणे

रुपी बॅंकेच्या पाच लाख ठेवीदारांना मिळणार ९६५ कोटी

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : रुपी को-ऑप. बॅंकेच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना ठेव विमा महामंडळामार्फत (डीआयसीजीसी) त्यांच्या ठेवी परत मिळणार आहेत. त्यासाठी बॅंकेला येत्या ४५ दिवसांत ठेवीदारांचे क्लेम ‘डीआयसीजीसी’कडे सादर करणे आवश्यक आहे. पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांची संख्या ९९ टक्के असून, या ठेवीदारांना ९६५ कोटींची रक्कम द्यावी लागणार आहे.

केंद्र सरकारने अडचणीतील बॅंकांच्या ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्यासाठी सुधारित ठेव विमा कायदा पारित केला आहे. त्यानुसार रुपी बँकेलाही ठेवीदारांना पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत कराव्या लागणार आहेत. रुपी बॅंकेतील पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांची संख्या चार लाख ९६ हजार इतकी आहे. ठेवीदारांना आपली ठेव रक्कम मिळविण्यासाठी बॅंकेकडे कागदपत्रांची (केवायसी) पूर्तता करावी लागणार आहे.

रुपी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण करण्याबाबत रुपी आणि राज्य बॅंकेने संयुक्त प्रस्ताव दिला होता. परंतु रिझर्व्ह बॅंकेने तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर रुपीचे बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशीही मागणी पुढे आली. तसेच, बॅंकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी रिझर्व्ह बॅंकेला रुपी बॅंकेचे सक्षम बॅंकेत विलीनीकरण, लघुवित्त बॅंकेत रूपांतर किंवा बॅंकेचे पुनरुज्जीवन असे पर्याय सुचविले होते.

३७५ कोटींच्या ठेवी बुडण्याची भीती

रुपी बॅंकेत पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांची संख्या चार हजार ३०० इतकी आहे. त्यांच्या ठेवी सुमारे ५७५ कोटींच्या आहेत. त्यांना पाच लाखांपर्यंत ठेवी परत केल्यानंतर उर्वरित ३७५ कोटींच्या ठेवी बुडण्याची भीती आहे. या ठेवीदारांना उर्वरित रक्कम देण्यासाठी बॅंकेला कर्ज वसूल करून ‘डीआयसीजीसी’ने दिलेल्या रकमेची परतफेड करावी लागेल. त्यानंतरच या ठेवीदारांना पाच लाखांवरील रक्कम मिळणे शक्य होणार आहे.

‘डीआयसीजीसी’च्या निर्देशानुसार पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत कराव्या लागतील. ठेवीदारांनी केवायसी पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र, याचा अर्थ बँक अवसानायात जाणार असा नाही. सर्व ठेवीदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी बँकेचे विलिनीकरण, लघुवित्त बँकेत रूपांतर अथवा बँकेचे पुनरुज्जीवन यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरुच राहतील.

- सुधीर पंडित, प्रशासक, रुपी बँक

रुपी बॅंकेची मार्च २०२१ अखेर स्थिती

  • ठेवी : १२९७ कोटी रुपये

  • कर्जे : २९४ कोटी रुपये

  • पाच लाखांपर्यंतच्या ठेवी : ९६५ कोटी रुपये

  • पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांची संख्या : ४ लाख ९६ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT