KPG26B10861
कोपरगाव ः विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाऊसाहेब काळवाघे.
स्वप्ने मोठी ठेवा, पण सुरुवात छोटी करा
भाऊसाहेब काळवाघे ः के. जे. सोमैया महाविद्यालयात स्टार्टअप कार्यशाळा
कोपरगाव, ता. २५ ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या कौशल्यातून व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करावा. मोठी स्वप्ने जरूर पहा. मात्र त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सुरुवात छोट्या व्यवसायापासून करा. छोट्या व्यवसायातून अनुभव, आत्मविश्वास आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करून पुढे व्यवसायाचा विस्तार करता येतो, असे प्रतिपादन गोदावरी इक्विपमेंट्स प्रा. लि.चे संस्थापक भाऊसाहेब कळवाघे यांनी केले.
के. जे. सोमैया महाविद्यालयाअंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष, स्टार्टअप अँड इनोव्हेशन सेल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामीण स्टार्टअप्स: आव्हाने, संधी आणि यशोगाथा'' या विषयावर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.
काळवाघे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय ही एक उत्तम संधी आहे. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन न राहता उद्योजकतेचे माध्यम बनली पाहिजे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्थानिक उपलब्ध संसाधने, शेतीतील समस्या आणि बाजारपेठेच्या गरजा ओळखून त्यातून नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. नामदेव ढोकळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. नीलेश पोटे यांनी आभार मानले. प्रा. चंचल विभुते, प्रा. कीर्ती वाकचौरे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रा. सदाशिव नागरे, डॉ. शंकरय्या कोंडा, डॉ. रवींद्र जाधव, प्रा. वैष्णवी मगर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
कोट------
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नवोपक्रम आणि स्टार्टअपची संस्कृती विकसित व्हावी, यासाठी महाविद्यालयाचा स्टार्टअप अँड इनोव्हेशन सेल सातत्याने उपक्रम, व्याख्याने आयोजित करीत असतो.
-- डॉ. विजय ठाणगे, प्राचार्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.