पुणे

‘साडी शास्त्र’ प्रदर्शनाचे दिल्लीत उद्‌घाटन

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ७ : राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधून भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेला समर्पित ‘साडी शास्त्र’ या कला-ऐतिहासिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी इंडिया इंटरनॅशनल सेंटर (आयआयसी) येथे केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात भारतातील हातमाग, हस्तचित्रकला, भरतकाम तसेच भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त वस्त्रपरंपरेचे वैभव उलगडण्यात आले आहे. भारताच्या हातमाग परंपरेचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या संकल्पनेला बळ देणारा असल्याचे खडसे यावेळी म्हणाल्या. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही यावेळी केले. ‘शिखाज करिगरी’तर्फे आयोजित या प्रदर्शनाच्या संस्थापक शिखा अजमेरा यांनी, भारतीय विणकर आणि कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. कला इतिहासकार आदित्य के. झा यांच्या क्युरेशनखाली भरविण्यात आलेले हे प्रदर्शन नऊ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

Marathi News Live Updates : जालन्यात महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Nagpur Crime : निर्भयच्या घरात आढळला सुऱ्या, चॉपर, लॅपटॉप अन् गर्भनिरोधकांचा साठा

Akola News : काँग्रेसचे विशेष निरीक्षक डॉ. अभय पाटील यांच्या भेटीला! पक्ष सोडू नये; तक्रारी दूर करण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT