Sakal Auto Expo 2023 sakal
पुणे

Auto Expo : मनपसंत कार व बाइक निवडण्याची संधी; एकाच ठिकाणी असंख्य ब्रॅंड्स

आपल्या घरी स्वप्नातील कार, बाइक किंवा ईव्ही यावी, असे प्रत्येकालाच वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवार (ता. १०) व रविवारी (ता. ११) भव्य ‘ऑटो एक्स्पो २०२३’चे आयोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आपल्या घरी स्वप्नातील कार, बाइक किंवा ईव्ही यावी, असे प्रत्येकालाच वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवार (ता. १०) व रविवारी (ता. ११) भव्य ‘ऑटो एक्स्पो २०२३’चे आयोजन केले आहे.

कार किंवा बाइक घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा हजारो प्रश्नांची उत्तरे शोधत फिरावे लागते. पण, या सर्व प्रश्नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात तेव्हा खऱ्याअर्थाने गाडी घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. याचाच विचार करून ‘सकाळ’ने दोन दिवसांच्या ‘ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे.

बजेटनुसार गाडी घेणाऱ्यांसाठी हा एक्स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, याठिकाणी विविध कंपन्यांच्या कार आणि बाइक, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या किमती आदींची माहिती मिळणार आहे. एवढेचं नव्हे तर या एक्स्पोमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक व्हेईकलचेही असंख्य पर्याय पाहायला मिळतील.

कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे दोन दिवस ऑटो एक्स्पो होणार असून बजेट कार्स, सेडान कार्स, हॅचबॅक कार्स, एसयुव्ही, स्पोर्ट, इलेक्ट्रिक कार्स, ईव्ही-बाइक्स आदी अनेक प्रकारच्या उत्पादनांची माहिती मिळणार आहे. नव्याने लाँच झालेल्या अनेक दुचाकी, मोटारीही येथे पाहायला मिळतील. वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठ्याचे अनेक पर्यायही येथे उपलब्ध आहेत. त्यांच्या ईएमआयसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरेही ग्राहकांना याठिकाणी मिळणार आहेत. हा एक्स्पो सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. संपर्क : ९३२५१०६६२६

सकाळ ऑटो एक्स्पोविषयी...

कोठे : पंडित फार्म्स, डीपी रोड, कर्वेनगर

कधी : शनिवारी (ता. १०) आणि रविवारी (ता. ११)

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

सुविधा : प्रवेश आणि पार्किंग मोफत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

UP Farm Scheme: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! यूपीमध्ये कृषी यंत्रांवरील अनुदानासाठी आजपासून ऑनलाइन बुकिंग सुरू

IND VS ENG 2ND ODI: विराट कोहलीचा विश्वविक्रम! मोडला श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम; सचिन, धोनी यांनाही सोडले मागे

Shivalay Park: अवघ्या ५० रुपयांत करा भारताच्या नकाशावर '१२ ज्योतिर्लिंगांसह' प्रमुख शिवदर्शन! प्रयागराजमध्ये साकारला भव्य 'शिवालय पार्क'

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

SCROLL FOR NEXT