पुणे

सकाळ लिटफेस्ट वक्ते

CD

सकाळ लिटफेस्टमधील वक्ते (२० डेस टू गो)


मेधा देशमुख भास्करन (फोटो------------60825)

मेधा देशमुख भास्करन या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी जर्मनी, भारत आणि संयुक्त अरब अमिराती येथील अन्नपदार्थ आणि औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये विपणन तसेच व्यवसायविकास क्षेत्रांत काम केले आहे. भारतातील आणि आखाती देशांतील आघाडीच्या वृत्तपत्रांसाठी त्यांनी वैद्यकीय विषयांवरील विविध लेख लिहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असलेल्या ‘चॅलेंजिंग डेस्टिनी’ या गाजलेल्या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. या पुस्तकाला २०१७मधील ‘रेमंड क्रॉसवर्ड बुक’ पुरस्कारासाठी लोकप्रिय वैचारिक लेखन आणि चरित्र या दोन विभागांत नामांकन मिळाले होते. ‘चॅलेंजिंग डेस्टिनी’चे मराठी भाषांतर ‘झुंज नियतीशी’ आणि हिंदी भाषांतर ‘नियती को चुनौती’ या नावांनी प्रकाशित झाले आहे. ‘फ्रंटियर्स’ ही ऐतिहासिक कादंबरी त्यांची पहिली काल्पनिक साहित्यकृती असून, ती ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने प्रकाशित केली आहे. या कादंबरीची ‘रणसंग्राम’ ही मराठी आवृत्ती मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली आहे. ‘लाइफ अँड डेथ ऑफ संभाजी’ ही ऐतिहासिक कादंबरी त्यांची दुसरी काल्पनिक साहित्यकृती आहे. या पुस्तकाची ‘शिवाजी के सुपुत्र की शौर्यगाथा’ ही हिंदी आवृत्ती ‘प्रभात पब्लिकेशन’ने प्रकाशित केली आहे. ‘प्रिस्क्रिप्शन ऑफ लाइफ’ हे त्यांचे दुसरे वैचारिक पुस्तक आहे. औषधनिर्मिती आणि औषधांच्या विश्वातील रंजक घडामोडींचा वेध घेतला आहे. सामाजिक प्रश्नांवरील ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ हे पुस्तक ‘सकाळ पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला फिक्कीचा ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट पुस्तक’ (इंग्रजी, वैचारिक लेखन) हा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाची मराठी आवृत्तीही उपलब्ध आहे.
-------------------------------------------------------------------------------------

सैकत मजुमदार (फोटो-----------60822

सैकत मजुमदार हे कादंबरीकार, समीक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांच्या नावावर पाच कादंबऱ्या असून, त्यांची ‘द रिमेन्स ऑफ द बॉडी’ (२०२४) हा अलीकडे प्रकाशित झालेली कादंबरी आहे. त्यांच्या अन्य कादंबऱ्यांमध्ये ‘द सेंट ऑफ गॉड’ (२०१९) आणि ‘द फायरबर्ड’ (२०१५) यांचा समावेश होतो. त्यांनी वैचारिक लेखन आणि समीक्षा या विषयांवरील चार पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांपैकी अलीकडे प्रकाशित झालेले ‘ओपन इंटेलिजन्स : एज्युकेशन बिटवीन आर्ट अँड आर्टिफिशियल’ (२०२६) हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील शिक्षणाच्या विविध शक्यतांचा वेध घेते. तसेच, ‘द अमॅच्युअर’ (२०२४) या पुस्तकात त्यांनी स्वयंशिक्षित व्यक्तींच्या तसेच हौशी वाचकांच्या आणि लेखकांच्या वाचन-लेखनविषयक पद्धतींचा ऊहापोह केला आहे. सध्या ते अशोका विद्यापीठात इंग्रजी आणि सर्जनशील लेखन या विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.


------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? आता नवीन तारीख, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

IND vs NZ 1st T20I : भुवनेश्वर कुमार पुढच्या सामन्याला मुकणार? १६व्या षटकात नेमके काय घडले? Video Viral; बघा पुनरागमन कसे राहिले

सेट नाही खरा आहे 'दृश्यम'च्या विजय साळगावकरचा बंगला; ८५ वर्षीय महिला करतेय देखभाल, तुम्हाला पाहायचाय? हा घ्या पत्ता

Latest Marathi News Live Update : तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी, बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा

IND vs NZ 1st T20I: भुवनेश्वर कुमारच्या 'कमबॅक'ची चर्चा... पण न्यूझीलंड फलंदाजांचा दबदबा, भारतासमोर सर्वोच्च धावसंख्या...

SCROLL FOR NEXT