लोगो : तनिष्का
साताऱ्यात उद्या बरसणार ‘सकाळ श्रावणसरी’
मंगळागौरसह विविध स्पर्धा; महिलांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ
सातारा, ता. २५ : रोजच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या लीलया पेलत स्वतःची ओळख जपू पाहणाऱ्या गृहिणींना दैनिक सकाळतर्फे ‘सकाळ श्रावणसरी’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवारी (ता. २७) दुपारी एक वाजता शाहू कलामंदिरात होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक एलजी हिंग आहेत, तसेच वेदानोवा हे कार्यक्रमाचे हेल्थ पार्टनर आहेत. कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोवळे उन्ह, अधूनमधून बरसणाऱ्या श्रावणसरी अन् महिलांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या सणांची रेलचेल असलेल्या श्रावणातील आल्हाददायक वातावरणात महिलांच्या नवचैतन्याला ‘सकाळ’चे ‘तनिष्का व्यासपीठ’ वाट करून देणार आहे. तेव्हा या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन तनिष्का व्यासपीठातर्फे करण्यात आले आहे.
...............................
चौकट
‘श्रावणसरी’मधील विविध स्पर्धा
ः या कार्यक्रमात मंगळागौर स्पर्धा, श्रावण क्वीन स्पर्धा, एलजी हिंग डाळ आणि सांबर पाककला स्पर्धा, हिंग म्हणजे ‘एलजी’च अनुभव कथन स्पर्धा आणि मराठमोळा फॅशन वॉक अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे.
मंगळागौर स्पर्धेत सादरीकरणासाठी चार मिनिटांचा कालावधी देण्यात येणार असून, स्पर्धकांनी पेन ड्राइव्हमध्ये चार मिनिटांचा ट्रॅक अथवा गाणी तयार करून आणावीत. या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी हॉलमध्ये तयार राहणे आवश्यक आहे.
ः श्रावण क्वीन स्पर्धेत श्रावणातील नैसर्गिक पाने, फळे, फुले आणि भाज्यांचा वापर करून आकर्षक दागिन्यांचा साज परिधान करून रॅम्पवॉक करायचा आहे.
ः एलजी हिंग डाळ आणि सांबर स्पर्धेत ‘द्या हिंगाचा तडका आणि दाखवा तुमच्या चवीचा झटका’ या संकल्पनेतून सहभागी स्पर्धकांनी डाळ अथवा सांबर घरून तयार करून आणायचे आहे. त्यानंतर पदार्थाच्या सजावटीसाठी तीस मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.
ः ‘हिंग म्हणजे एलजी’च या अनोख्या स्पर्धेत सहभागी महिलांनी आपल्या आयुष्यातील एखादा आठवणीतील झणझणीत, तडकेदार प्रसंग दोन मिनिटांत सांगायचा असून, त्यामध्ये एलजी हिंगचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
ः मराठमोळ्या फॅशन वॉकमध्ये पारंपरिक पोशाख आणि दागिने परिधान करून सहभागी महिलांना रॅम्पवॉक करता येणार आहे.
चौकट
प्रवेश विनामूल्य
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला आहे. पहिल्या ५०० महिलांसाठी खास गिफ्ट दिले जाणार आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी प्रियांका धायगुडे ९४२३५ २८४३४ आणि मिनाज मुजावर ९०२१७ २१९५५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दैनिक ‘सकाळ’तर्फे करण्यात आले आहे.
कोठे, केव्हा, कधी
- स्पर्धेचे ठिकाण ः शाहू कलामंदिरात
- वार ः गुरुवार
- वेळ ः दुपारी एक
PNE26W44652
श्रावणसरी लोगो
.............................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.