पुणे

फायनल टेनिस स्पर्धा

CD

PNE26W59887 - टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा चेक स्वीकारल्यानंतर उपस्थित डावीकडून विकास सोनी , करण सिंग, समीर बॅनर्जी , राजीव देसाई व लिना नागेशकर .


अमेरिकेच्या समीरचा टायब्रेकमध्ये ‘चॅम्पियन पंच’!
करण सिंगला तीन सेटमध्ये नमवले; दोन तासांच्या संघर्षानंतर विजेतेपद


सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : अंतिम सेट टायब्रेकपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत निर्णायक क्षणी आक्रमक खेळ करत अमेरिकेच्या सहाव्या मानांकित समीर बॅनर्जी याने विजेतेपदावर नाव कोरले. पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करणाऱ्या समीरने भारताच्या तिसऱ्या मानांकित करण सिंगला २-६, ६-४, ७-६ (४) असे नमवले. तब्बल दोन तास सात मिनिटे चाललेल्या या लढतीत टायब्रेकमध्ये बाजी मारत समीरने एमएसएलटीए-एसडीएलटीए आयटीएफ ३० हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील अंतिम सामना सोलापूर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्ट, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाला.
सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये करण सिंगने वर्चस्व राखत समीरला ६-२ असे नमवले. दुसऱ्या सेटमध्ये समीरने नवव्या गेममध्ये करणची सर्व्हिस भेदत समीरने हा सेट ६-४ असा जिंकला आणि सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवी झुंज दिली. दोघांचाही तोडीस तोड खेळ झाल्याने सेटचा निकाल टायब्रेकमध्ये लागला. या निर्णायक क्षणी समीरने आक्रमक खेळ करत ७-६ (४) अशी बाजी मारली. त्यामुळे पहिला सेट गमावल्यानंतरही सामन्यात पुनरागमन करून समीरने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
-----------------------------------------
विजेत्याला ४ लाख ३९ हजारांचे पारितोषिक
स्पर्धेच्या विजेत्या समीर बॅनर्जी याला करंडक, ४ लाख ३९ हजार ६२ रुपये आणि २५ आयटीएफ गुण देण्यात आले. उपविजेता करण सिंग याला करंडक, २ लाख ५७ हजार १३५ रुपये आणि १४ आयटीएफ गुण मिळाले. उद्योगपती विकास सोनी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी स्पर्धेच्या पर्यवेक्षक लीना नागेशकर, नेविल पिठावाला, पंकज शहा, वामसीकृष्ण देवसानी, मोनिका आळंद आणि श्रीकांत कामरेड्डी यांच्यासह खेळाडू, पालक व अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा संचालक राजीव देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
----------------------------------------
निकाल : मुख्य ड्रॉ, पुरुष एकेरी, अंतिम फेरी- समीर बॅनर्जी (अमेरिका, सहावा मानांकित) विजयी वि. करण सिंग (भारत, तिसरा मानांकित) २-६, ६-४, ७-६ (४). सामना कालावधी : २ तास ७ मिनिटे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT