पुणे

सांगोल्यात १३३ पाकिटे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

CD

सांगोल्यात १३ हजारांचा
पान मसाल्याचा साठा जप्त
‘अन्न व औषध’ची कारवाई; दोघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. २२ : सांगोला- पंढरपूर रोडवरील रक्षा नाश्ता सेंटरमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांची १३३ पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्यांची एकूण किंमत १३ हजार ७१० रुपये आहे. या प्रकरणी भारती संतोष ठोकळे (वय ४०, रा. मराठी शाळेजवळ, भीमनगर, सांगोला) तसेच पंढरपूर येथील एका अज्ञात पुरवठादाराविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी गणेश महादेव कदम यांच्या फिर्यादीनुसार, २१ ऑगस्ट रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस पथकासह रक्षा नाश्ता सेंटरची तपासणी केली. यावेळी विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले.
चौकशीत हा माल पंढरपूर येथील एका अज्ञात व्यक्तीकडून दुचाकीवरून आणून पुढील विक्रीसाठी पुरवठा केला जात असल्याचे समोर आले. संबंधित व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांकही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जप्त केलेला माल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
प्रतिबंधित पदार्थांची पुनर्विक्री होऊ नये म्हणून संबंधित गाळे पुढील आदेशापर्यंत सीलबंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित पदार्थांचा मूळ पुरवठादार, मालक आणि संबंधित गाळ्यांच्या मालकीबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

Velhe News : राजगड तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट! भोंदूबाबा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्यास थेट कारवाई, वेल्हे पोलिसांचा कडक इशारा

Ausa News : शाळेत घुसून शिक्षकांना निलंबनाची धमकी; अभिजीत दिपकेसह पाच जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल

MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Marathi News Live Updates : चाकणमध्ये वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT