राऊत बिश्नोई टोळीचा खबऱ्या?
त्यांची पण चौकशी करा
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मागणी
पंढरपूर, ता. २२ : संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत हे बिश्नोई टोळीचा खबऱ्या आहेत का? त्यांना सगळं कसं माहिती, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे गुरुवारी (ता. २२) पंढरपूर येथे आले असता, त्यांनी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. गोरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर मला काही माहीत नाही. मी निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने मी ती क्लिप ऐकलेली नाही. राज ठाकरे पाच वर्षात पाच भूमिका घेतात. राज ठाकरे यांच्या पक्षाला अस्तित्व नाही ते कधी मोदींचे कौतुक करतात. दोन वेळा मोदींच्या विरोधात बोलतात असा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत हे काही बिश्नोई टोळीचे टिपर आहेत का? त्यांना एवढी माहिती असते. त्यांची चौकशी व्हायला हवी असे म्हणत संजय राऊत यांचावरही हल्लाबोल केला.
.....
बोगस शिक्षकांनी मतदान करू नये
पुणे विभाग शिक्षक निवडणूक मतदार यादीत ज्यांची नावे बोगस पद्धतीने आली आहेत, त्यांनी मतदान करू नये अन्यथा गुन्हे दाखल होतील. बार्शी येथे बोगस मतदान नोंदवण्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण संस्था अस्तित्वात नसताना त्यांची मतदार यादीत नावे नोंदविण्यात आलेली आहेत, ही गंभीर बाब समोर आली आहे. यामागे कोण आहे याचा तपास आणि त्यानंतर कारवाई होईल, असा इशारा आहे पालकमंत्री गोरे यांनी दिला आहे.