sankarshan karhade sakal
पुणे

Sankarshan Karhade : दिवस दोन, कलाकृती तीन, प्रयोग पाच! संकर्षण कऱ्हाडेबाबत जुळून आला अनोखा योग

व्यावसायिक मराठी रंगभूमीच्या इतिहासात एखाद्या कलाकाराने एकाच दिवसात चार किंवा पाच नाट्यप्रयोग करण्याचे विक्रम केले आहेत.

प्रशांत पाटील

पुणे - व्यावसायिक मराठी रंगभूमीच्या इतिहासात एखाद्या कलाकाराने एकाच दिवसात चार किंवा पाच नाट्यप्रयोग करण्याचे विक्रम केले आहेत. हीच परंपरा पुढे चालवत युवा लेखक-अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नुकताच मुंबईत एका दिवसात तीन कलाकृतींचे तीन प्रयोग केले. आता पुण्यात दोन दिवसांत तीन कलाकृतींचे पाच प्रयोग तो सादर करणार आहे.

या तीनही कलाकृती तो कलाकार म्हणून सादर करणार असून या तीनही कलाकृतींचे लेखन त्याचेच आहे. त्यामुळे हा दुर्मीळ योग यानिमित्ताने जुळून येणार आहे. या कलाकृतींमध्ये ‘तू म्हणशील तसं’ व ‘नियम व अटी लागू’ या दोन नाटकांचा आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कवितेच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

याबाबत संकर्षण म्हणाला, ‘हा योग जुळून आल्याने खूप आनंद होत आहे. एकतर मी नाटक लिहीन, असा कधी विचार केला नव्हता. ‘तू म्हणशील तसं’ या पहिल्या नाटकाचे आता ३१० प्रयोग झाले आहेत.

‘नियम व अटी लागू’ नाटकाचे ५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. तर, ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाचे १० प्रयोग झाले आहेत. आपण वेगवेगळ्या धाटणीचे काहीतरी लिहित आहोत आणि लोकांना ते आवडत आहे, याचा आनंद शब्दातीत आहे.’

आपलासा वाटेल असा आशय असलेली कलाकृती मराठी नाट्यरसिकांना नेहमीच आवडते. चांगल्या, दर्जेदार कलाकृतींकडे मराठी नाट्यरसिक कधीच पाठ फिरवत नाही. यात केवळ मनोरंजन करणारी नाटकेच नाही, तर गहिऱ्या अर्थाची नाटकेही त्यांना तेवढीच आवडतात. कोरोनानंतर देखील प्रेक्षक मनापासून मराठी नाटक पाहायला येत आहेत आणि आम्हाला बळ देत आहेत.

- संकर्षण कऱ्हाडे, युवा लेखक-अभिनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT