Traffic Update Esakal
पुणे

Traffic Update: ज्ञानोबा-तुकोबारायांच्या पालख्या आज दाखल होणार पुण्यनगरीत, वाहतुकीत मोठे बदल, या पर्यायी मार्गांचा करा वापर

Traffic Update: पुणे शहरामध्ये आज (ता ३०) रोजी संत श्री तुकाराम महाराज व संत श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींचे आगमन होणार आहे. या अनुषंगाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग व त्या परिसरातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे शहरामध्ये आज (ता ३०) रोजी संत श्री तुकाराम महाराज व संत श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींचे आगमन होणार आहे. या अनुषंगाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग व त्या परिसरातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड येथून रविवारी दुपारनंतर पुण्यात दाखल होणार आहे. दरम्यान, कोणकोणत्या ठिकाणी वाहतुकीत बदल होणार आहेत, याबाबतची माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी सोशल मिडीया एक्सवरती शेअर केली आहे.

हे मार्ग वाहतुकीसाठी असणार बंद

बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता वाहतूक बंद असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. येरवड्यातील मनोरुग्णालय (मेंटल कॉर्नर) ते आळंदी रस्ता चौक बंद राहणार आहे. तसेच चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता बंद असणार आहे.

दरम्यान, नवीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहतील, बाकी रस्ते सुरू राहतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.

या पर्यायी मार्गांचा करा वापर

धानोरी रोडने व अंतर्गत रोड, जेल रोड - विमानतळ रोड मार्गे, पर्णकुटी चौक - गुंजन चौक - जेल रोड - गॅरीसन इंजिनिअरींग चौक - विश्रांतवाडी चौक अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा

रेंजहिल्स - खडकी पो.स्टे अंडरपास पोल्ट्री फार्म चौक- जुना मुंबई - पुणे महामार्ग, रेंजहिल्स - सेनापती बापट रोड, नळ स्टॉप चौक, खंडोजीबाबा चौक कर्वे रोड सेनापती बापट रोड - रेंजहिल्स, गाडगीळ पुतळा - कुंभारवेस चौक - आर.टी.ओ. चौक जहांगीर मार्गे, पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल्स मार्गे किंवा औंध मार्गे, घोले टोड व आपटे रोड, कुंभारवेस - पवळे चौक - फडके हौद चौक मालधक्का चौक - नरपतगीर चौक - पंधरा ऑगस्ट चौक कमला नेहरू हॉस्पिटल

अंतर्गत रस्त्याने चर्च चौक, भाऊ पाटील - ब्रेमेन चौक औंध मार्ग, रेल्वे पोलीस मुख्यालया समोरुन औंध टोड - ब्रेमेन चौक अंतर्गत रस्त्याचा वापर करावा

बोपोडी चौकातून पुणे/मुंबई जाणारे वाहनांनी भाऊ पाटील रोडवरून औंध टोड मार्गे ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे.

१. आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चोक - कुंभार वेस चौक

२. आर.टी.ओ चौक - जहांगीर चौक - आंबेडकर सेतू ते गुंजन मार्गे - पर्णकुटी चौक बंडगार्डन वीज- महात्मा गांधी चौक मार्गे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT