पुणे

अखंड भक्तीचा उत्सव

CD

राजेंद्रकृष्ण कापसे ः सकाळ वृत्तसेवा
बारामती, ता. १५ : पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची वाटचाल पुण्यातून प्रारंभ झाल्यापासून प्रखर उन्हाच्या झळा सहन करतही वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात तल्लीन झालेले दिसतात. उष्णतेचा तडाखा, प्रवासाचा थकवा आणि शारीरिक कष्ट याद्वारे नामस्मरण, भजन-कीर्तन बाधा आणत असला तरी सामूहिक भक्तीच्या बळावर यावर मात करत, प्रत्येक पाऊल पुढे टाकत आहेत. या प्रवासात भक्तीभाव, चिकाटी आणि सहनशीलतेचा संगम अनुभवायला मिळाला. आज येथे मुक्कामी विसावताना उद्याच्या वाटचालीसाठी कीर्तन जागरातून आध्यात्मिक ऊर्जेचा गोळा करीत मुक्कामी विसावला.

‘या रे हरिदासांनो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढे किती बापुडें ॥
रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें मनाचिये आवडी ॥
येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥’
य अभंगात संत तुकाराम महाराज सर्व हरिभक्तांना आवाहन करतात की, आपण एकत्र येऊन नामस्मरण, भजन-कीर्तन आणि आनंदी भक्तीच्या माध्यमातून आलेल्या संकट, कळिकाळावर विजय मिळवू शकतो. भक्ती ही हसत-खेळत, विविध छंदांनी आणि मनापासून करावी; कारण खरी पूजा बाह्य कृतीत नसून अंतःकरणात नारायणाची भावना ठेवून करावी.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या नवव्या दिवशी उंडवडी ते बारामती हा प्रवास अखंड भक्तीचा उत्सव ठरला. पहाटेच्या गार वाऱ्याने माळरानावरच्या तळाला जणू भक्तीची हाक देत होता. ग्रामस्थांच्या हस्ते पादुकांना अभिषेक झाला. चोपदारांच्या सूचनेनंतर सोहळा पुढे मार्गस्थ झाला, आणि प्रत्येक पावलागणिक भक्तीची लय अधिकच खोल होत गेली.
दुपारच्या कडक उन्हातही वारकऱ्यांच्या उत्साहात कुठेही कमी नव्हती.बऱ्हाणपूर फाट्याकडे ग्रामस्थांनी रांगोळ्या काढून आणि मांडव उभारून स्वागत केले. पालखी थांबल्यावर रानात पंगती सुरू झाल्या, साधेपणाने घेतलेले भोजनही वारकऱ्यांसाठी प्रसादासमान ठरले. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हरिनामाचा गजर करत सोहळा बारामतीच्या दिशेने पुढे सरकला.
सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणात पालखी सोहळा शहराच्या दिशेने येऊ लागला तसा परिसरात भक्तीचा रंग अधिकच गडद झाला. नगरातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागतानंतर मोरेवाडी आणि शहा पेट्रोल पंप येथे विसावा घेत घेत सव्वा पाचच्या सुमारास सोहळा बारामतीच्या वेशीवर दाखल झाला. नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्र्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी पालखीचे स्वागत केले. शहराच्या बाजारपेठेतून मार्गक्रमण करताना ‘विठ्ठल विठ्ठल’च्या अखंड गजरात वारकरी तल्लीन झाले होते. नागरिकांनी रस्त्यालगत गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा ठेका आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.
सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास शारदा मंदिराच्या प्रांगणात सोहळा मुक्कामी विसावला, तेव्हा दिवसभराच्या प्रवासानंतरही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तीची प्रसन्नता झळकत होती. थकवा विसरून हरिनामात रंगलेले वारकरी, भक्तीच्या त्या सागरात पूर्णपणे लीन झाले होते. अशा या भक्तिमय वातावरणात, पालखी सोहळा सामूहिक भक्तीचा अनुभवली.


अजित पवार यांची स्मृती
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीत आगमन होण्यापूर्वी देशमुख चौकात स्वागत करण्याची परंपरा यंदा खंडित झाली. या स्वागत सोहळ्याला गेली अनेक वर्षे एक वेगळी ओळख मिळवून देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींनी सर्वांच्या मनाला चटका लावला. ते स्वतः देशमुख चौकात उपस्थित राहून पालखीचे स्वागत करत असत. स्वागतानंतर रथावर विराजमान होऊन मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत रथाचे सारथ्य करत वारकऱ्यांमध्ये एकरूप होत असत. बारामतीत प्रत्येक स्वागताच्या कक्षामध्ये अजितदादांच्या स्मृती जतन करून पालखीचे स्वागत केले जात होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी यंदाच्या पालखी सोहळ्यात जाणवत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IFS Officers Transfer: वन विभागात मोठा फेरबदल! IFS आणि HPFS च्या ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणी घेतला निर्णय? जाणून घ्या...

Indian Muslim: 'तू मुस्लिम आहेस का?'; अमेरिकेतील मॉलमध्ये भारतीय व्यक्तीवर 15 वार; अटकेनंतर हल्लेखोराने दिली कबुली

Pune News : कचरा प्रकल्पाच्या निविदेचे दर कमी करावे लागतील; आयुक्त नवल किशोर राम

Latest Marathi News Update: कालबाह्य चीज, चढ्या दराने पनीर, शाम्पू विकणे पडले महागात

Pune News : मोशी प्रकरणातील ठेकेदाराची पुण्यात निविदा; महापालिकेने अपात्र ठरविण्याकडे केले दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT