afu agriculture in saswad sakal
पुणे

Crime News : सासवडजवळ अफूची शेती! पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, दोघांना अटक

पुरंदर तालुक्यामधील कोडीत गावात शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुरंदर तालुक्यामधील कोडीत गावात शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेदहा किलो वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दशरथ सीताराम बडदे (वय ६५) आणि तानाजी निवृत्ती बडदे (वय ६९, रा. कोडित, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या ताब्यातून साडेदहा किलो वजनाची अफूची बोंडे जप्त केली आहेत. त्याची किंमत २१ हजार रुपये इतकी आहे.

कोडित गावात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, सासवड आणि राजगड पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोडीत गावातील शेतात मंगळवारी छापा टाकला. या दोघांनी त्यांच्या शेतात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. अफूचे पीक न दिसण्यासाठी कांदा आणि शेवंतीच्या फुलांची लागवड करण्यात आली होती.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक राहुल गावडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, दगडू वीरकर, सूरज नांगरे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बाजीराव ढेकले करीत आहेत. आरोपींना सासवड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघा आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कमी कालावधीत झटपट पैसा मिळविता येतो, अशी काहीजणांची धारणा झाली आहे. गांजा, अफू अशा अमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर लागवड करून त्याची विक्री केली जात आहे. जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे आणि अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

- पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT