पुणे

शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत

CD

सातारा टुडे मेन
..................

कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा

जिल्ह्यात ७,७८९ शेतकरी लाभापासून वंचित; फार्मर आयडी, ई केवायसी नसल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. १७ : शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ७०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. मात्र, तांत्रिक अटी आणि डिजिटल पडताळणीतील अडचणींमुळे अद्याप सात हजार ७८९ शेतकरी कर्जमाफीच्या रकमेपासून वंचित आहेत.
‘ई-केवायसी’ प्रमाणीकरण, फार्मर आयडी उपलब्ध नसल्याने पात्र असूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप रक्कम जमा करता आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी तातडीने काढावी, असे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे.
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत तीन टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १२०५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. विविध निकषांनुसार कर्जमुक्ती योजनेसाठी एकूण ३७ हजार १५९ शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी बहुतांश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणाऱ्या २९ हजार ७०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर २१९ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आली आहे. प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा झाल्याने या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. या हंगामासाठी नवीन पीककर्ज घेण्याचा शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

ई-केवायसी, फार्मर
आयडीची अडचण
जिल्ह्यात ३२ हजार १०७ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असले, तरी अजूनही पाच हजार ५२ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. याव्यतिरिक्त, दोन हजार ७३७ शेतकऱ्यांकडे शासनाचा डिजिटल ‘ॲग्री स्टॅक फार्मर आयडी’ उपलब्ध नाही. असे एकूण सात हजार ७८९ शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या नियमांनुसार, आधार प्रमाणीकरण आणि फार्मर आयडीची खात्री झाल्याशिवाय सॉफ्टवेअर प्रणालीमधून अनुदानाची रक्कम पुढे जात नाही.

ही आहेत कारणे
बहुतांश शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी बँक खाते किंवा मोबाइल क्रमांक लिंक नसणे, बोटांचे ठसे न जुळणे आणि ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव यामुळे प्रमाणीकरणाचे काम रखडले आहे. परिणामी, शेतकरी पात्र असूनही केवळ डिजिटल नोंदींअभावी हक्काच्या रकमेची वाट पाहात आहेत.

प्रशासनाकडून प्रयत्न
तांत्रिक अडचणींमुळे कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांनी नजीकच्या ''आपले सरकार'' सेवा केंद्र, सीएससी सेंटर किंवा संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन बायोमेट्रिक अथवा ओटीपीच्या माध्यमातून प्रमाणीकरण पूर्ण करावे, तसेच गावातील कृषी सहाय्यक, तलाठी अथवा कृषी विभागाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून स्वतःचा ‘फार्मर आयडी’ तयार करून घ्यावा. या दोन्ही तांत्रिक बाबींची पूर्तता होताच प्रलंबित रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.

चौकट
........
कर्जमुक्तीची स्थिती
जिल्ह्यातील पात्र शेतकरी : ३७,१५९
ई-केवायसी पूर्ण केलेले : ३२,१०७
रक्कम वर्ग झालेले : २९,७०५
वितरित अनुदान : २१९.९० कोटी रुपये
ई-केवायसी रखडलेले शेतकरी : ५,०५२
फार्मर आयडी नसलेले शेतकरी : २,७३७

..........................................


नियमित कर्ज
भरणारे वाऱ्यावरच

दुष्काळ, नापिकी आणि भीषण पाणीटंचाईशी दोन हात करत पोटाला चिमटा काढून शेतकऱ्यांनी कर्जाचे नियमित हप्ते फेडले; मात्र त्यांच्या वाट्याला केवळ शासकीय अनास्था आली आहे. थकीत कर्जदारांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम तातडीने जमा होत असताना, वेळेवर देणी देणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अजूनही प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी जाहीर केलेले अवघे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अद्याप खात्यावर वर्ग न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
थकबाकीदारांना लगेच दिलासा मिळतो, मग प्रामाणिकपणे बँकांची देणी देणाऱ्यांवरच हा अन्याय का? असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात सोशल मीडियावर चाईल्ड मोड येणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण शिफारस; ''इंटरनेट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार..''

मराठवाड्यात FDA ची धडक कारवाई! व्हेज-नॉनव्हेज मिक्स, झुरळांचा सुळसुळाट; डोमिनोज आउटलेटचा परवाना रद्द

Latest Marathi News Live Update : जुहूमध्ये अभिनेता अजय देवगणच्या बंगल्यावर महापालिकेची मोठी कारवाई, अनधिकृत बांधकामाचे काही भाग पाडले

Crime News: श्रीरामनगरमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; बारा तासाच्या आत चौघांना अटक

दोन थोबाडीत माराव्याश्या वाटत होत्या... ललित प्रभाकरला पहिल्यांदा कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर काय म्हणाले उज्ज्वल निकम?

SCROLL FOR NEXT