arrested in bribe case sakal
पुणे

Pune Crime : सातबारा नोंदीसाठी ८० हजारांची लाच; मध्यस्थाविरुध्द गुन्हा दाखल

सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडे ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एका मध्यस्थ व्यक्तीविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडे ८० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एका मध्यस्थ व्यक्तीविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्यस्थ व्यक्तीने थेऊरच्या तत्कालीन मंडल अधिकाऱ्यासाठी लाचेची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाने ३१ मार्च रोजी ही कारवाई केली. विजय सुदाम नाईकनवरे (रा. नागपूर चाळ, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या मध्यस्थाचे नाव आहे.

याबाबत ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय तक्रारदार शेतकऱ्याची कोलवडी (ता. हवेली) येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद आणि फेरफार मंजूर करण्यासाठी विजय नाईकनवरे याने थेऊरच्या मंडल अधिकाऱ्यासाठी शेतकऱ्याकडे ८० हजार रुपयांची मागणी केली. परंतु याबाबत शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली.

‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात नाईकनवरे याने मंडल अधिकाऱ्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून नाईकनवरे याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT