Pune University : sakal
पुणे

Pune University : पीएच.डी. प्रवेशात आता मराठा आरक्षण ; विद्यापीठाकडून कार्यवाही

पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा समावेश करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवश्यक बदल करणार आहे. याबाबत विद्यापीठाच्या वतीने कार्यवाही सुरू असल्याने पीएच.डी. प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी (पेट) उमेदवारांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा समावेश करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवश्यक बदल करणार आहे. याबाबत विद्यापीठाच्या वतीने कार्यवाही सुरू असल्याने पीएच.डी. प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी (पेट) उमेदवारांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याऐवजी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेट परीक्षा होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या अंतर्गत पीएच.डी. करता यावी म्हणून पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी उत्सुक असतात. पीएच.डी.च्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेप्रमाणेच (नेट) राज्यस्तरीय पात्रता परीक्षेलाही (सेट) मान्यता आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षांमध्ये आवश्यक गुण प्राप्त न झालेले विद्यार्थी ‘पेट’च्या माध्यमातून प्रवेशाला पसंती देतात.

पीएच.डी. प्रवेशासाठी असलेली स्पर्धा पाहता मराठा आरक्षणाची अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे अधिकारी सांगतात. राज्य शासनाने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच त्यासंदर्भातील अध्यादेशही प्रसिद्ध केला. २६ फेब्रुवारीपासून या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी केंद्रनिहाय आरक्षण देण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचे परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल.

मतदान आणि परीक्षा

पीएच.डी. प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी (पेट) उपलब्ध तारखा आणि मतदानाच्या तारखा यांचा मेळ विद्यापीठाला घालावा लागणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण देत मे महिन्यातील परीक्षा पार पाडणे विद्यापीठासमोरील आव्हान असणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच विद्यापीठाला ‘पेट’ परीक्षेची तारीख निश्‍चित करणे सोईस्कर ठरणार आहे.

राज्य शासनाने सकल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेमध्ये याची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. त्यादृष्टीने आवश्यक बदल करण्यात येत असून, नियोजित वेळेपेक्षा फार तर आठवडाभर उशिराने ‘पेट’ परीक्षा पार पडेल.

- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT