Pune News sakal
पुणे

Pune News : आंनदी जीवन हेच अंतिम ध्येय असावे ; कुलगुरू प्रा. डॉ. गोसावी

शिक्षण हे मूल्यवर्धनाचे साधन असून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी मूल्यशिक्षणाला नवीन शैक्षणिक धोरणात महत्व दिले जात आहे. ज्यामुळे शिक्षण हे समाजात ज्ञान परावर्तित करण्याचे माध्यम बनेल.

कृष्णकांत कोबल

हडपसर : शिक्षण हे मूल्यवर्धनाचे साधन असून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी मूल्यशिक्षणाला नवीन शैक्षणिक धोरणात महत्व दिले जात आहे. ज्यामुळे शिक्षण हे समाजात ज्ञान परावर्तित करण्याचे माध्यम बनेल. जगाची गरज ओळखून त्या क्षेत्रात पारंगत व्हावे. मात्र, आंनदी जीवन हेच अंतिम ध्येय असावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.

येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी बोलत होते.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य अ‍ॅड. संदीप कदम, पार्श्वगायक संदिप उबाळे, पोलिस उप अधिक्षक, अर्जुन पुरस्कार विजेते, कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेते राहुल आवारे, संस्थेचे खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख यांच्या हस्ते यावेळी १३५ गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचा गुणगौरव करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, शारिरीक शिक्षण संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. राहुल नरंगलकर, आय. क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. रमाकांत जोशी, जिमखाना समिती सदस्य प्रा. सचिनकुमार शहा, कार्यालयीन अधिक्षक गणेश साबळे, विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी विशाल कोलते यांनी संयोजन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'मतदार राजा जागा हो' या पथनाट्याने झाली तर, सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली. बक्षिसांचे वाचन डॉ. अण्णासाहेब निंबाळकर, डॉ. वंदना सोनवले, डॉ. अशोक ससाणे, डॉ. बाजीराव शिंदे, डॉ. धीरज देशमुख, प्रा. मधुमंजरी ओक, प्रा. अनिल दाहोत्रे, प्रा. प्रितम ओव्हाळ, डॉ. शुभांगी औटी यांनी केले. डॉ. सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर, डॉ. प्रशांत मुळे यांनी आभार मानले.

हडपसर : अण्णासाहेब मगर महाविद्यालयच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT