पुणे

जाहिरातींबाबत समान नियमांचा ‘सेबी’चा प्रस्ताव सेलिब्रिटीची व्याख्या व जाहिरातींसाठी त्यांचे वर्गीकरणदेखील स्पष्ट

CD

जाहिरातींबाबत समान नियमांचा ‘सेबी’चा प्रस्ताव
सेलिब्रिटीची व्याख्या व जाहिरातींसाठी त्यांचे वर्गीकरणदेखील स्पष्ट

मुंबई, ता. २५ ः भांडवल बाजार निायमक सेबीने आपल्या अखत्यारीतील सर्व संस्थांसाठी एक समान जाहिरात संहिता आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. याचा उद्देश जाहिरातींचे नियमन सोपे करणे आणि लहान संस्थांसाठी अनुपालन खर्च कमी करणे हा आहे. काही अटी आणि योग्य स्पष्टीकरणांसह ब्रँड किंवा संस्थांसाठी सेलिब्रिटींच्या जाहिरातींना परवानगी देण्याचा प्रस्ताव सेबीने मांडला आहे. तसेच सेलिब्रिटीची व्याख्या आणि जाहिरातींसाठी त्यांचे वर्गीकरणदेखील स्पष्ट केले असून, इंडस्ट्री स्टँडर्ड्स फोरम आणि अॅम्फी यांच्यासह इतरांशी चर्चा केल्यानंतर एक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर १४ जुलैपर्यंत अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

सेबीने जाहिरातींसाठी पूर्व-मंजुरी मॉडेलमधून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अहवाल देण्याच्या मॉडेलकडे वळण्याचा प्रस्ताव दिला आहे. जाहिरातदाराला जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या २४ तासांच्या आत सेबीला कळवावे लागेल, असेही नियामकाने नमूद केले आहे. एसएमएस आणि वेबसाइट पॉप-अपमधील संक्षिप्त जाहिरातींमध्ये अस्वीकरणांची आवश्यकता नाही, परंतु त्यासाठी एक हायपरलिंक दिली पाहिजे, असा प्रस्ताव सेबीने दिला आहे. अनेक कंपन्या जाहिरातींमध्ये रेटिंग आणि रँकिंगचा वापर करतात. असे रँकिंग केवळ तेव्हाच वापरले जावे, जेव्हा ते पास्ट रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सीद्वारे जारी केले गेले असेल. पूर्णपणे शैक्षणिक सामग्री समान जाहिरात संहितेच्या अंतर्गत येणार नाही. कंपन्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार डार्क पॅटर्नचा वापर करू नये, असाही प्रस्ताव सेबीने दिला आहे. हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर, सेबी (मध्यस्थी विनियम), २००८ मध्ये सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय, संस्थांना त्यांच्या जाहिरातींच्या प्रकाशनाची माहिती देण्यासाठी एक रिपोर्टिंग पोर्टल स्थापन केले जाईल, असेही सेबीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT