Security guard has burglary of one crore  
पुणे

सुरक्षा रक्षकाकडून प्राधिकरणात एक कोटींची घरफोडी 

संदीप घिसे

पिंपरी : कटावणीच्या साहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण निगडी येथे शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. सुरक्षा रक्षकानेच ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
 विनोद राजकुमार अगरवाल (वय 48, रा. पंचवटी बंगला, वृंदावन हॉटेलच्या बाजूला, भक्‍ती-शक्‍ती चौकाजवळ, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गोविंद कालू परियार (रा. कलाली, लमकी, देश नेपाळ) व त्याचे साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी बंगल्यामध्ये पाच अगरवाल बंधू राहतात. त्यांच्या नातेवाइकांचा टिळ्याचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी पुण्यात असल्याने सर्व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गेले. रात्री दीडच्या सुमारास ते परत घरी आल्यावर त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी बंगल्यातील दोन घरांचे दरवाजे आपल्या साथीदारांच्या मदतीने कटावणीच्या साहाय्याने उचकटून आतील रोख रक्‍कम, सोने-चांदी आणि हिऱ्याचे दागिने असा 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आरोपींच्या शोधासाठी दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
अगरवाल कुटुंबीय कार्यक्रमासाठी गेल्यावर सुरक्षारक्षक परियार याने आपल्या साथीदारांना सायंकाळी 7.20 वाजताच्या सुमारास बोलावून घेतले. 

चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येऊ नये म्हणून कनेक्‍शन बंद केले. त्यानंतर कटावणीच्या साहाय्याने दोन दरवाजांचे लॅचलॉक तोडले आणि घरात प्रवेश केला. काचेचा दरवाजा उघडत नसल्याने एका चोरट्याने तो तोडण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या हाताला काच लागली. त्यामुळे घटनास्थळी रक्‍ताचे दाग आढळले. 
ओळखीनेच केला घात अगरवाल कुटुंबीयांकडे पूर्वी एक सुरक्षारक्षक दहा वर्षांपासून कामाला होता. तो गावाला जाताना त्याने आपल्या जवळच्या नातेवाइकास नोकरीसाठी ठेवले. त्या नातेवाइकाने आपल्या ओळखीच्या व्यक्‍तीला म्हणजे परियार याला नोकरीला ठेवले. त्याच्याबाबत कोणतीही माहिती अगरवाल कुटुंबीयांनी घेतलेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT