shugar factory sakal
पुणे

भीमा कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू : रमेश थोरात

पुणे जिल्हा बँकेकडील १५० कोटी रूपयांची थकबाकी गेली दोन वर्षापासून थकलेली असल्याने बँकेने कारखाना जप्तीची कारवाई सुरू केली आहे

रमेश वत्रे

केडगाव : भीमा पाटस कारखान्याची पुणे जिल्हा बँकेकडील १५० कोटी रूपयांची थकबाकी गेली दोन वर्षापासून थकलेली असल्याने बँकेने कारखाना जप्तीची कारवाई सुरू केली आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष तथा दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी आज दिली.

थोरात म्हणाले, बँकेने कारखान्याला भांडवली कर्ज व मध्यम मुदत कर्ज दिलेले आहे. गेल्या दोन वर्षापासून कारखाना थकबाकीत गेला आहे. अनेक प्रयत्न करूनही कर्जाची वसुली होत नाही. त्यामुळे बँकेच्या नियमानुसार आम्ही थकबाकीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. थकबाकीबाबत आम्ही कोणालाही वसुलीमध्ये सवलत देत नाही.

राज्यात महायुतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद पडललेल्या भीमा पाटस कारखान्याला ३६ कोटी रूपयांचे कर्ज दिले होते. त्या वर्षी कसातरी कारखाना चालू झाला. कारखाना सुरू रहावा यासाठी हे कर्ज दिले होते मात्र कारखाना पुन्हा बंद पडला. याचे सर्वांनाच मोठे आश्चर्य आहे. भीमा पाटसमुळे बँकेच्या एनपीएमध्ये वाढ झाली आहे.

कारवाईबाबत थोरात म्हणाले, सुरक्षा कायद्यानुसार आम्हाला कारवाई करण्याच्या सुचना आल्या आहेत. कारखाना थकबाकीत गेलेला असताना कारवाई का केली नाही असा मुद्दा लेखापरिक्षणातही निघू शकतो. आमच्या अंगलट काही येऊ नये म्हणून सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे. कामकाजात कुठेही बेशीस्तपणा चालत नाही म्हणून पुणे जिल्हा बँक देशात टॅापला आहे.

याबाबत भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे आमदार राहुल कुल म्हणाले, कायद्याच्या, नियमांचा चौकटीत राहून आम्ही पुणे जिल्हा बँकेला काही प्रस्ताव दिले आहेत. ते बँकेने मान्य केले तर कारखाना सुरू करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश येऊ शकते. बँकेच्या कायदेशीर कारवाईला आमचा विरोध असणार नाही. मात्र बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी कारखान्याची जप्ती करण्यापेक्षा आमचे प्रस्ताव स्वीकारून कारखाना सुरू करण्यात पुढाकार घ्यावा. थोरात यांनी प्रस्ताव स्वीकारून सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT