पुणे

झोपेत असलेल्या ज्येष्ठाच्या खात्यातून १० लाख लंपास

CD

पुणे, ता. २१ : धनकवडीतील ६२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती... दिवसभराचे काम आटोपून, रात्री जेवण करून ते नेहमीप्रमाणे झोपी गेले. ना मोबाईलवर कसला संशयास्पद फोन, ना त्यांनी अनोळखी लिंकवर क्लिक केले होते. शिवाय, ओटीपीही सांगितला नव्हता. मात्र, साखरझोपेत असताना सायबर चोरट्याने ज्येष्ठाच्या बँक खात्यातून पावणेदहा लाख रुपये लंपास केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. सायबर चोरट्यांनी पासवर्ड न मागता तंत्रज्ञानाचा वापर करून ज्येष्ठाच्या बँक खात्याचे नियंत्रण हातात घेतले. अवघ्या काही मिनिटांत एकामागून एक व्यवहार झाले आणि तब्बल नऊ लाख ७७ हजार रुपयांची आयुष्यभराची पुंजी अज्ञात खात्यांमध्ये वळवली.
सकाळी ज्येष्ठ नागरिकाची नजर मोबाइलच्या स्क्रीनवर पडली. सलग बँक व्यवहारांचे आलेले संदेश पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या पैशांवर म्हातारपणाची आणि औषधोपचारांची भिस्त होती, ते खाते अक्षरशः रिकामे झाले होते. या धक्क्यातून सावरत त्यांनी बँकेत धाव घेतली. खाते गोठवल्यानंतर त्यांनी सहकारनगर पोलिस ठाणे गाठले.

‘‘मी तर झोपेत होतो, कोणाला ओटीपीही दिला नाही, मग पैसे गेले कसे?’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सायबर चोरट्यांनी ‘रिमोट ॲक्सेस’ अथवा फोनमध्ये छुप्या मालवेअरच्या माध्यमातून दुसऱ्या बँक खात्यात रक्कम वळविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सहकारनगर पोलिस आणि सायबर सेल चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT