पुणे

श्री शनैश्वर जयंती बातमी

CD

PNE26W19634 - सोलापूर : शनिमंदिर येथे बुंदी व मसाला भात प्रसाद म्हणून वाटताना.
PNE26W19639 - श्री शनिदेव.
PNE26W19633 - कर्णिक नगर येथील शनैश्वरांना तैलाभिषेक करण्यासाठी भक्तांची झालेली गर्दी.

दहा हजारांहून अधिक भाविकांचा शनैश्वरांना ‘थेट तैलाभिषेक’
१७ तासांत २५ हजार भक्तांचे दर्शन; शनिजयंती उत्साहात साजरी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : शनिजयंतीनिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, कर्णिकनगर आणि दत्त चौक येथील शनी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. तब्बल १७ तास सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये शहर व जिल्ह्यातील सुमारे २५ हजारांहून अधिक भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. यंदा रेल्वे स्टेशन परिसरातील मंदिरात प्रथमच सर्वसामान्य भाविकांना थेट तैलाभिषेक करण्याची संधी देण्यात आल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
रेल्वे स्टेशनजवळील शनी मंदिरात सकाळी सहा वाजता रुद्राभिषेकाने धार्मिक विधींना सुरुवात झाली. काळे वस्त्र, तेल, तीळ आणि मीठ अर्पण करत सुमारे १० हजारांहून अधिक भाविकांनी शनैश्वरांना तैलाभिषेक केला. अलंकार पूजनानंतर दुपारी १२ वाजता ‘शनी महाराज की जय’च्या जयघोषात पाळणा सोहळा पार पडला. उत्सव समितीच्या वतीने भाविकांना मसाला भात आणि बुंदी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
---------------------------
कर्णिकनगर व दत्त चौकातही भक्तांची गर्दी
कर्णिकनगर येथील शनैश्वर मंदिरात दिवसभर नवग्रह पूजा, होमहवन, लघुरुद्राभिषेक आणि आरतीचे आयोजन केले होते. दुपारी पाळणा सोहळा उत्साहात पार पडला. देवस्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड यांनी उपस्थितांना शनिजयंतीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व सांगितले. येथेही भाविकांना थेट तैलाभिषेकाची संधी देण्यात आली होती.
दत्त चौकातील शनी मंदिरातही भाविकांचा प्रचंड ओघ पाहायला मिळाला. दर्शनासाठी लागलेली रांग थेट श्री शुभराय मठापर्यंत पोचली होती. शहर व जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करून सेवाभावही जपला.
----------------------------------
कोट PNE26W19585
यंदा श्री शनैश्वरांना दिवसातून दोन वेळा रुद्राभिषेक करण्यात आला. प्रथमच श्री शनि महाराजांना थेट तैलाभिषेकाची संधी देण्यात आली होती. त्यामुळे भक्तांमध्ये वेगळाच उत्साह होता.
- कल्लय्या गणेचारी, प्रधान अर्चक, रेल्वे स्टेशन शनि मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

SCROLL FOR NEXT