Sharad Mohol Murder case Latest update Pune Police Action On Mastermind vithal shelar video goes viral  
पुणे

Sharad Mohol Case : पुणे पोलीसांचा दणका! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची त्याच्याच भागात काढली धिंड, पाहा Video

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची पुणे पोलीसांनी धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे, या घटनेचा व्हिडीओ देखील आता व्हायरल होत आहे.

रोहित कणसे

पुणे शहरात तीघांनी भरदीवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या प्रकरणात अनेकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड गुंड विठ्ठल शेलार आणि मुन्ना पोळेकर हे असल्याचे पोलीसांच्या तपासत समोर आले आहे.

तसेच या प्रकरणातील संशयित मास्टरमाइंड गणेश मारणे फरार असून, गुन्हे शाखेच्या पथकांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान पुणे पोलीसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड विठ्ठल शेलाराची पोलिसांनी धिंड काढल्याची प्रकार समोर आला आहे. ( Sharad Mohol Murder Case)

पुणे गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल शेलारची त्याच्याच भागात धिंड काढली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस शेलारला बेड्या घालून रस्त्यावरून घेऊन जाताना दिसत आहेत. गुंड विठ्ठल शेलार शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे पोलिसाच्या ताब्यात आहे, शेलार वर अनेक गुन्हे दाखल आहेत.

मोहोळची भररस्त्यात हत्या केल्यानंतर पुणेकरांच्या मनात आरोपी शेलार याच्याविषयी दहशत पसरली होती. हीच दहशत कमी करण्यासाठी पोलीसांनी शेलार याची भररस्त्यावरून धिंड काढल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेने आत्तापर्यंत विठ्ठल महादेव शेलार आणि रामदास ऊर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (दोघे रा. मुळशी) यांच्यासह १५ जणांना अटक केली आहे. याशिवाय आणखी नऊ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

पोलीस तरपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांनी शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचला होता. तसेच मोहोळचा खून होण्यापूर्वी दोघांची बैठक देखील झाली होती. शेलार याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलार याच्यासह सहा संशयितांना पनवेल परिसरातून ताब्यात घेतले होते. कोथरूड परिसरात पाच जानेवारीला दुपारी शरद मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

या प्रकरणी गुन्हे शाखेने त्याचदिवशी रात्री साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांच्यासह दोन वकिलांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT