Sharad Mohol Murder Case New Update News marathi 
पुणे

Sharad Mohol Murder Case : ...तर शरद मोहोळ वाचला असता!, मुन्ना पोळेकरनं पोलीस तपासात असं काय सांगितलं?

Sharad Mohol Murder Case New Update News | Sharad Mohol च्या हत्येआधी Munna Polekar नं Ajay Sutar वर गोळ्या का झाडल्या?

Komal Jadhav (कोमल जाधव)

Sharad Mohol Murder Case New Update News : मुळशी पॅटर्न चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा थरार असल्याचं आता हळूहळू पोलीस तपासात समोर येत आहे.

अशातच भरदिवसा, पुण्यातल्या कोथरुडमधील सुतारदरा भागात, जिथे शरद मोहोळ राहायचा, त्या परिसरातच मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्या मुन्ना पोळेकरनं याआधीही एकावर गोळीबार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे तो गोळीबार जर पोलिसांना वेळेत कळला असता तर आज शरद मोहोळ वाचला असता असंही बोललं जात आहे.

शरद मोहोळची हत्या ही मुन्ना पोळेकर अन् नितीन कानगुडे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीत आणि शांत डोक्यानं केलेली दिसतेय. कारण, मुन्ना पोळेकर हा वयानं जरी २० वर्षांचा असला तरी त्यांच्या डोक्यातलं गँगवॉर हे कायम सुरुच होतं असं दिसतंय. कारण, शरद मोहोळनं नितीन कानगुडे याचा १० वर्षांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला त्यांनी आता घेतला तेही शरद मोहोळला संपवून. पण, आता याच प्रकरणातली एक महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ते म्हणजे शरद मोहोळला संपवणाऱ्या २० वर्षांच्या मुन्ना पोळेकरनं मोहोळच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वीच अजय सुतारवर गोळीबार केला होता. पण, तो गुन्हा बाहेर आला नाही अन् पुढे शरद मोहोळची ५ जानेवारीला हत्या करण्यात आली.

आता मोहोळआधी जो गोळीबार झाला, त्यावेळी नेमकं काय घडलं?

तर, मुन्ना पोळेकरनं ज्याच्यावर गोळीबार केला तो म्हणजे अजय सुतार. हा अजय सुतार नितीन कानगुडेचा मित्र. नितीन कानगुडेनं अजयला चांदणी चौकात भेटायला बोलावलं. त्यानंतर तिथून अजयला घेऊन मुन्ना पोळेकर, नितीन कानगुडे हे भूगावातील कानगुडेच्या घरी गेले. तिथे पार्किंगमध्ये बसले, त्यावेळी मुन्ना आणि नितीन कानगुडेनं अजयला शरद मोहोळचा खून करायचा आहे, तू त्यात सामील हो असं सांगितलं. पण अजयला ते पटलं नाही आणि त्यानं या हत्येच्या कटात सहभागी व्हायला नकार दिला. आणि तो नितीन कानगुडेच्या घरुन जीव मुठीत धरुन पळाला. पण, त्याचवेळी मुन्ना पोळेकरनं पळणाऱ्या अजयवर गोळीबार केला. त्यातली एक गोळी ही अजयच्या पायातून आरपार गेली तर दुसरी गोळी पायाला चाटून गेली. यावेळी गंभीर जखमी झालेल्या अजय सुतारला या दोघांनीच खासगी रुग्णालयात दाखल केलं अन् त्याला जर शरद मोहोळच्या हत्येचं कुणाला कळालं तर जीवानिशी मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अजय सुतारही गप्प राहिला.

पण, आता शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता, मुन्ना पोळेकरनं शरद मोहोळआधीही एकावर गोळीबार केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता मोहोळच्या हत्येआधीच्या घटना एकेक करुन पोलीस तपासात समोर येत आहेत. तरी, नुकतंच पोलिसांनी आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्या एकालाही जेरबंद केल्याची माहिती आहे तर त्यांना पिस्तुलं पुरवणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. त्यामुळे आता शरद मोहोळ प्रकरणात आणखी काय काय कंगोरे समोर येताहेत हे पाहणं महत्वाचं असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : शतक केलं, GT ला फायनलमध्येही नेलं अन् मग शुभमन गिलनं आई-वडिलांना मैदानातच मारली कडकडून मिठी; Video Viral

ऐश्वर्या नारकर यांना पाहून खुश पण प्रोमो पाहून भ्रमनिरास; असं काय आहे 'आमच्या लाडक्या नाईक बाई' प्रोमोमध्ये?

Latest Marathi Update Live: पुण्यात विषारी दारू मृत्यु प्रकरणी युवक काँग्रेसच आंदोलन

गल्लीतील सोया चाप आता होणार ग्लोबल! योगींच्या ODOC योजनेत गाझियाबादची निवड; पाहा काय आहे क्रेझ?

Samsung Galaxy S25 स्मार्टफोनवर चक्क 24 हजार रुपयांचा डिस्काउंट; खरेदीसाठी रांगा, कुठे सुरुय ऑफर पाहा

SCROLL FOR NEXT