Sharad Mohol murder case 
पुणे

Sharad Mohol Dead: शरद मोहोळ हत्याप्रकरणात ६ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी तर वकिलांना...

पुण्यातून गुंड शरद मोहोळच्या हत्येची खळबळजनक घटना काल (शुक्रवार) समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी एका वाहनातून 8 आरोपींना अटक करण्यात आली होती.

Sandip Kapde

Sharad Mohol Dead: पुण्यातून गुंड शरद मोहोळच्या हत्येची खळबळजनक घटना काल (शुक्रवार) समोर आली होती. शुक्रवारी गुंड शरद मोहोळ याची त्याच्याच टोळीतील सदस्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका वाहनातून 8 आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.

दरम्यान कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात ६ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपीसह ५ आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अटक केलेल्या दोन वकिलांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Pune Crime News)

पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा परिसरात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ यांच्या छातीत गोळी लागली. शरद मोहोळच्या उजव्या खांद्यावर दोन गोळ्या लागल्या. त्यानंतर गुंड शरद मोहोळ याला कोथरूड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर दोन जणांनी रस्त्यावर गोळीबार केला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले. या दोघांचे शरद मोहोळसोबत वैमनस्य होते. यामुळे प्रकरणात हल्ला झाल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा पेच; परवान्याअभावी शेतकऱ्यांसमोर अडचणींचे सावट

SCROLL FOR NEXT