Sharad Pawar Sakal
पुणे

शरद पवारांनी वारज्यातील जुन्या आठवणींना दिला उजाळा

विकासातून दिलीप बराटे यांनी एकवाक्यता जपली, काम उत्तम केल्याचे केले कौतुक

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : वारज्याला २५- ३० वर्षापूर्वी मी यायचो. पूर्वीची संस्कृती, परंपरा, सर्वांच्यामध्ये सामंजस्य होतं. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे राहतात. त्यांची राज्य, भाषा, पद्धती वेगळी आहे. असे असून पूर्वीची कमतरता कमी होऊ न देता कार्यकर्त्यांचा संच घेऊन, लोकांच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक राहत. नगरसेवक दिलीप बराटे, माजी आमदार कुमार गोसावी यांनी मोठ्या कष्टांने एक वाक्यता ठेवली. वारज्याचा विकास करण्यात हि मंडळी यशस्वी झाली. असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या वारजे यथील कै.सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टिस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पवारांचा सत्कार दिलीप बराटे यांच्या पत्नी शुभांगी, मुलगा अभ्युदय व स्नुषा प्रीन्सिका, पुतण्या हिंदकेसरी अमोल बराटे यांच्या हस्ते केला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार कुमार गोसावी, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, नगरसेवक सचिन दोडके, अनिता इंगळे, शुक्राचार्य वांजळे, विकास दांगट, प्रवीण शिंदे, काका चव्हाण, त्रिंबक मोकाशी उपस्थित होते.

येथे शेती, आंब्याची झाडे होती. ग्रामपंचायत, सरपंच, पोलिस पाटील असायचे. गावात एका विचाराने गावाचा कारभार चालविण्याला जायचा. असे जुन वारजे मला आठवतय, असे सांगून शरद पवार म्हणाले, “दिल्ली-मुंबई प्रमाणे या हॉस्पिटलची आखणी आहे. साधने, सुविधा, महापालिका देईल. हॉस्पिटल सुसज्ज झाले आहे. रुग्णांचे संकट, आरोग्याची दुखणी येथे सुटतील. या हॉस्पिटलने मोठा आधार झाला आहे. दिलीप बराटे, महापालिकेच्या माध्यमातून उत्तम काम झाले आहे.”

बराटे म्हणाले, वारजेतील १९८४ पासून तीन पाणी योजना राबविताना शरद पवार यांचा सहभाग होता. मला चार वेळा नगरसेवक, विधानसभा, पंचायत समितीची उमेदवारी, राष्ट्र्वादिचा पहिला उपमहापौर होण्याची संधी दिली. त्यातून २० वर्षात ६०० कोटीची कामे केली.

राष्ट्रवादी’ची १० वर्ष सत्ता असताना शहराच्या इतिहासात सर्वात जास्त हॉस्पिटल, नाट्यगृह, गार्डन केली आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यामतून २३ प्रकल्प सुरु आहेत. असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, पालिका निवडणुकीत वारजेतील पॅनेल विजयी करणारे दिलीप बराटे आहेत. कै.सुभद्राबाई प्रभाकर बराटे यांचे नाव हॉस्पिटलला नाव दिल्याने मातृत्वाचे काम येथे सुरु राहील. सूत्रसंचालन चंद्रकांत पंडित यांनी केले तर आभार दिपाली धुमाळ यांनी मानले.

पवार, मेट्रो व वारजे योगायोग

वारजे जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करताना २००५ मध्ये केले. त्यावेळी, महापालिकेला मेट्रोचा प्रस्ताव देण्याच्या शरद पवार यांनी सूचना केल्या होत्या. आज तुम्ही वारजे येथे आला आहात, उद्या मेट्रोचे उदघाटन होत आहे. पवार, मेट्रो आणि वारजे यांचा एक योगायोग दिलीप बराटे यांनी सांगितला. पौड फाटा ते वारजे, स्वारगेट ते खडकवासला असे मेट्रोचे मार्गासाठी तुम्ही हातभार लावावा. अशी मागणी बराटे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुकानदाराला लाठ्या-काठ्यांनी मारहाण, लाथाबुक्क्याही मारल्या; CCTV व्हिडीओ समोर

Latest Marathi News Update : जमीन लिलावाच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

Sujay Vikhe Patil: सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे एकत्र; रामगिरी महाराज म्हणाले, ‘खासदारकीची खुर्ची हवी’

Raju Shetti Warning To Sugar Factories : पहिला गव्हाणीत आमचं रक्त जाईल, त्यानंतर तुमचा ऊस जाईल; साखर कारखाने सुरू करण्यावरून राजू शेट्टींचा सरकारसह कारखानदारांना सज्जड दम

SCROLL FOR NEXT