Sharad Pawar sakal
पुणे

Sharad Pawar: विधानसभा निवडणुक जिंकण्याचा पवारांचा 'प्लॅन' ठरला, कार्यकर्त्यांना दिले हे निर्देश!

Pune: पवार यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील १६ पंचायत समिती गणातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणूक प्रचाराची पेरणी सुरु केली.

डी के वळसे पाटील

manchar: “भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सत्तेचा वापर ठराविक लोकांच्या फायद्यासाठी व काही जणांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी केला. शेतात घाम गाळणार्या शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने व शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखावून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता हातात घेईल.” असा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

तांबडेमळा-मंचर (ता.आंबेगाव) येथे शनिवारी (ता.२०) राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या जनता दरबारात पवार बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, शेखर पाचुंदकर बाळासाहेब बाणखेले, सदाशिव थिटे उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील १६ पंचायत समिती गणातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणूक प्रचाराची पेरणी सुरु केली.

पवार म्हणाले “शेतकरी व तरुणांचे रोजगाराचे प्रश्न प्रश्न सोडवू. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना जागृत करण्याचे काम करावे.लोकसभा निवडणुकीप्रमाणेच सर्वांची साथ भक्कम राहू द्या.जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यासह राज्यातील प्रत्येक जागा जिंकायच्या आहेत. देशात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकाचे आपल्या सर्वांना करायचा आहे. त्या दृष्टीने कामाला लागा.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT