Sharad Pawar esakal
पुणे

Sharad Pawar: "मोदी वगळता सर्व पंतप्रधानांनी विरोधकांचा सन्मान केला, राऊत म्हणतात जसे पुतीन तसे..."; शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar: शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसात पक्षप्रवेश करणार असल्याचे देखील पवारांनी स्पष्ट केले.

Sandip Kapde

Sharad Pawar:

धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत शरद पवार गटात पक्षप्रवेश वाढत आहेत. जनमानसातलं स्थान लक्षात घेऊन पक्ष निर्णय घेत आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. अतुल देशमुख यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर देखील शरद पवार यांनी वक्तव्य केले. राजघराण्यात दत्तक नवीन गोष्ट नाही. दत्तक झाल्यावर तो घराण्याचा प्रतिनिधी होतो. शाहु छत्रपती यांच्याबाबत जनतेमध्ये कृतज्ञता आहे आणि त्यांच्यावर टीका करणे, यातून विरोधकांची मानसिकता दिसून येते,  असे शरद पवार म्हणाले.

धैर्यशील मोहिते पाटील मला भेटून गेले आहेत. ते दोन दिवसात पक्षात प्रवेश करणार आहेत. सर्वांसोबत चर्चा करुन पक्ष निर्णय घेत असतो. कुणाशीही लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील भाष्य केले. रामटेक येथील सभेत्या मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावर पवार म्हणाले, "नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची कितपत प्रतिष्ठा राखतायत हा प्रश्न मला पडतो. मोदी वगळता सर्व पंतप्रधानांनी विरोधकांचा सन्मान केला. लोकशाहीत विरोधकांना महत्व आहे आणि मोदी सांगतात एकही विरोधकांना निवडून देऊ नका. आज शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की पुतीन आणि नरेंद्र मोदी यात काहीच फरक नाही. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT